डॉ. बाबासाहेब यांची जयंती उत्साहात आणि
शांततेत साजरी करा -अप्पर जिल्हाधिकारी पाटील
विजवितरण कंपनीला दक्ष राहण्याचे आदेश
बीड (रिपोर्टर) घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती असल्याने या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रशासकीय अधिकार्यांची बैठक झाली. ही बैठक अप्पर जिल्हाधिकारी उत्तमराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जयंती उत्सव शांततेत पार पडली. प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष दंडाधिकारी म्हणून नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जयंती उत्साहात आणि शांततेत साजरी करण्याचे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह आदी पोलीस अधिकार्यांची उपस्थिती होती.
बैठकीला सर्व तालुक्यांचे तहसीलदार, नायब तहसीलदार, वीज वितरण कंपनीचे अधिकारी त्याचबरोबर आरडीसी संतोष राऊत, दयानंद जगताप, नामदेव टिळेकर, रविंद्र शिंदे, वाळके, पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्यासह आदींची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात आणि शांततेत साजरी व्हावी यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये नायब तहसीलदार यांची विशेष न्याय दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीला अप्पर जिल्हाधिकार्यांनी काही निर्देश दिले आहेत. जयंती दिवशी वीजपुरवठा खंडीत होऊ नये याबाबत अधिकार्यांसह कर्मचार्यांनी दक्षता घ्यावी, दरम्यान पाटील यांनी जयंती उत्सव शांततेत पार पाडण्याबाबत अधिकार्यांसह कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.