Friday, October 22, 2021
No menu items!
Homeक्राईमराखेच्या प्रदुषणाने त्रस्त महिलांचा आक्रमक पवित्रा

राखेच्या प्रदुषणाने त्रस्त महिलांचा आक्रमक पवित्रा


वाहन चालकांना चोप देत रस्त्यावर सांडलेली राख साफ करावयास लावली
परळी (रिपोर्टर):- परळी औष्णीक विद्युत केंद्रातून दररोज अनेक टिप्पर द्वारे राखेची वाहतूक केली जाते. राख घेऊन जात असताना ती झाकली जात नसल्याने राख रस्त्याने सांडते. त्यामुळे आजुबाजुच्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. आज पांगरी येथील महिलांनी रस्त्यावर उतरत प्रत्येक टिप्पर चालकाला अडवले. एका टिप्पर चालकास तर चपलाने मारहाण करून थांबवलेल्या सर्वच टिप्पर चालकांकडून त्यांनी रस्त्यावर सांडलेली राख अक्षरश: झाडून काढावयास लावली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

parli rakh.JPG 2


परळी येथे औष्णीक विद्युत केंद्र असल्याने या ठिकाणावरून दररोज अनेक टिप्परने राखेची वाहतूक केली जाते. राखेची वाहतूक करत असताना राख झाकली नाही. त्यामुळे राख रस्त्याने सांडत चालते. याचा त्रास आजुबाजुच्या नागरिकांना सहन करावा लागतो. रस्त्याची पडलेली राख वार्‍याने लोकांच्या घरात जाते.

parli rakh.JPG 3

याचा दुष्परिणाम म्हणून विविध आजारांना निबंधण मिळते. आज पांगरी येथील महिलांनी राख घेऊन जाणार्‍या टिप्पर चालकांना चांगलीच अद्दल घडविली. सगळ्या टिप्पर चालकांना रस्त्यावर अडवले. एका चालकास तर महिलांनी चपलाने मारहाण करून जाब विचारला. रस्त्यावर पडलेली राख सर्व टिप्पर चालकांकडून साफ करून घेतली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Most Popular

error: Content is protected !!