माजलगाव (रिपोर्टर): माजलगाव येथील गेवराई रोडवरील मुंदडा उद्योग समूहाच्या ऑइल मिल ला शॉर्टसर्किटमुळे आग लागली या आगीने प्रचंड रौद्ररूप धारण केल्यामुळे या आगीत मशिनरीसह मार जळुन खाक झाल्यामुळे प्रचंड अर्थिक नुकसान झाले आहे सुदैवाने या आगीमध्ये जीवित हानी झाली नाही ही आग विझवण्यासाठी माजलगाव धारूर पाथरी मानवत येथील अग्निशामक गाडीच्या कर्मचार्यांनी व व्यापार्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत परंतु 18 तास होऊनही आग मात्र सुरूच आहे.
माजलगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी लच्छुशेठ मुंदडा यांची गेवराई रोडवर मुंदडा उद्योग समूहाचे ऑइल मिल आहे.
मुंदडा सेठ नेहमी प्रमाणे दिवसभर काम करून दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ऑइल मिल बंद करून घरी गेले घरी गेल्यानंतर मिलमध्ये फिटर आणि वाचमन हे नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान मिल ला चक्कर मारून पाहणी करीत असताना वॉचमन ला मिलला आग लागल्याचे निदर्शनास आले मिल्ला आग लागली आहे असे फिटरला सांगितले नंतर फिटर ने मुंदडा शेठ यांना मोबाईल वरून मिलला आग लागली असले कळवले तात्काळ प्रसिद्ध व्यापारी रामेश्वर टवानी व्यापारी कर्मचारी आदींनी मिल कडे धाव घेतली रामेश्वर टवानी यांनी माजलगाव मानवत धारूर पाथरी अग्निशामक गाड्यांशी संपर्क करून त्यांना पाचारण केले व मेहता यांच्या ट्रॅक्टर ला पाचारण केले
मात्र तोपर्यंत आगीने झपाट्याने रौद्ररूप धारण केले याआगीत मध्ये मशनरी माल जळून खाक झाल्याने प्रचंड लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे ही आग विझवण्यासाठी अग्निशामक गाड्या व कर्मचार्यांनी व्यापारी रामेश्वर टवानी सुरेंद्र रेदासणी प्रभाकर होके शशिकिरण गडम, यांच्यासह व्यापारी कामगार यांनी शर्तीचे प्रयत्न केले आहेत.