परळी (रिपोर्टर) जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत आज शनिवार दि.15 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी मत्री आ. धनंजय मुंडे यांनी आश्रयदाता सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल असता त्यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने आ. धनंजय मुंडे बिनविरोध निवड झाली आहे. तसेच इतर जागेवर तडजोडीचे राजकारण सर्वपक्षाकडून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवाहर एजयकेशन सोसायटीची निवडूनक बिनविरोध होण्याची दाट शक्यता झाली आहे.
परळी शहरातील नावाजलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीची अखेर 12 वर्षानंतर निवडणुक जाहिर झाली.निवडणुक अधिकारी द.ल.सावंत यांनी 34 जागेसाठी निवडणुक कार्यक्रम जाहिर केला.दि.6 मे रोजी निवडणुक तर 7 मे रोजी निकाल जाहिर होणार आहे. या शिक्षण संस्थेची निवडणुक घेण्यात यावी यासाठी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे व प्रा. सदाशिव मुंडे, पंडितराव दौड, उत्तमराव देशमुख, भास्कर मामा चाटे,कुंडलिकराव मुंडे, डॉ. पी. एल. कराड, सुरेश (नाना) फड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदिप खाडे यांनी न्यायालयीन लढा लढल्यानंतर धर्मादाय उपायुक्त यांनी 31 मे पर्यंत निवडणुक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी दि.15 एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वैद्यनाथ विकास पॅनलचे उमेदवार आ.धनंजय मुंडे यांचा आश्रयदाता सभासद मध्ये अर्ज दाखल करण्यात आला. त्यांच्या जागी एकमेव अर्ज आल्यामुळे आ. धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. वैद्यनाथ विकास पॅनलचे एकूण सर्व जागेवर अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तसेच दुसर्या जागेसाठीही एकूण 102 अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुक अधिकारी द.ल.सावंत यांनी सर्व कामकाज पाहत आहेत