Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeबीडजिल्ह्यात १७० पॉझिटिव्ह

जिल्ह्यात १७० पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज कमी जास्त होत आहे. मात्र आष्टी तालुक्यातील संसर्ग वाढत चालला आहे. आज आलेल्या अहवालात आष्टी तालुक्यात तब्बल ६४ जण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहे. तर जिल्ह्याचाही आकडा वाढला असून तो १७० वर गेला आहे.


आरोग्य विभागाने काल बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील घेतलेल्या ३६६१ संशयीतांचा अहवाल आज दुपारी आला असून त्यामध्ये ३३९१ जण निगेटिव्ह आढळून आले आहे. तर १७० जण बाधीत झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये अंबाजोगाई ८, आष्टी ६४, बीड १९, धारुर ३, गेवराई १८, केज १९, माजलगांव ७, परळी २, पाटोदा १४, शिरुर १२ आणि वडवणी तालुक्यात १२ रुग्ण आढळून आले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!