आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश
बीड (रिपोर्टर) प्रादेशिक पर्यटन (तिर्थक्षेत्र) विकास योजने अंतर्गत बीड तालुक्यातील श्री.मंगलमुर्ती देवस्थान नवगण राजुरी 1 कोटी तर शिरूर का. तालुक्यातील रायमोहा येथील जगदंब देवस्थान ‘ब’ दर्जा प्राप्त व 1 कोटी व श्री क्षेत्र अंतरीक्षनारायण जालिंदरनाथ येवलवाडी येथील विकासकामासाठी 50 लक्ष रूपयाचा निधी उपलब्ध झाला असून आ.संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या निधीतून वरील देवस्थानाचा कायापालट होणार असून भाविक भक्तांसाठी आणि देवस्थानासाठी सभागृह,भक्त निवास,पाणीपुरवठा, वाहनतळ, विद्युत रोशनाई आदी सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
आ.संदीप क्षीरसागर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात बीड मतदार संघातील आणि शिरूर तालुक्यातील. प्रादेशिक पर्यटन (तिर्थक्षेत्र) विकास योजने अंतर्गत बीड तालुक्यातील श्री.मंगलमुर्ती देवस्थान नवगण राजुरी 1 कोटी तर शिरूर का. तालुक्यातील रायमोहा येथील जगदंब देवस्थान 1 कोटी व श्री क्षेत्र अंतरीक्षनारायण जालिंदरनाथ येवलवाडी येथील विकासकामासाठी 50 लक्ष रूपयाचा निधी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, ग्रामविकास मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे उपलब्ध झाला आहे तसेच नारायण गड, कपिलधार, शहेंशाहवली दर्गा व आदी देवस्थानाच्या विकास कामे करणेसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरात लवकर या तिर्थक्षेत्रासाठी निधी प्राप्त होईल असा विश्वास प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.