Sunday, July 25, 2021
No menu items!
Homeबीडमहागाईच्या निषेधार्थ कम्युनिष्ट पार्टीचे कलेक्टर कचेरीसमोर निदर्शने

महागाईच्या निषेधार्थ कम्युनिष्ट पार्टीचे कलेक्टर कचेरीसमोर निदर्शने


शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा: खताच्या किंमती कमी करून शेतकर्‍यांना दिलासा द्या
बीड (रिपोर्टर):- पेट्रोल-डिझेलचा भाव दोन दिवसाला वाढत असल्याने यामुळे सर्वसामान्य नागरीक त्रस्त झाले आहे. वाढती महागाईमुळे नागरीकांना जगणं मुश्किल होवू लागलं. महागाईच्या निषेधार्थ आज कम्युनिष्ट पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. सदरील हे आंदोलन कॉ.नामदेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.


पेट्रोल-डिझेलच्या किंमती तात्काळ कमी करण्यात याव्या, बि-बियाणे, खते, अवजारे आणि शेती विषयक औषधे यांच्या किंमतीमध्ये झालेली दरवाढ रद्द करण्यात यावी, शेतकरी विरोधी काळे कायदे आणि कामगारविरोधी कायदे रद्द करा, शेतकर्‍यांना पीक विम्याच्या संदर्भातील नुकसान भरपाई त्वरित अदा करण्यात यावी. शेतकर्‍यांना सुलभ रितीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. यासह इतर मागण्यासाठी आज कम्युनिष्ट पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कॉ.नामदेव चव्हाण, ज्योतीराम हुरकुडे, दत्ता भोसले, गोविंद साळवे, उत्तम सानप, डी.जी.तांदळे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेधाचे फलक दर्शवले. आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!