शहरातील 19 झोनमध्ये पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर
आठवडाभरात होणार शहराला मुलबक पाणीपुरवठा-आ.संदीप क्षीरसागर
बीड (प्रतिनिधी):- शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आ.संदीप क्षीरसागरांचे सातत्याने प्रयत्न सुरू असून शहराचा विस्तार लक्षात घेऊन अमृत अटल पाणी पुरवठा योजना शहरासाठी राबविली जात असून या योजनेत अनेक छोटे-छोटे काम रखडले होती. सध्या ते काम प्रगतीपथावर असून शहरातील 19 झोनमध्ये पाणीपुरवठा करणार्या सर्व ठिकाणच्या पाईपलाईन जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठवड्याभरात शहरवासीयांना मुबलक पाणी पुरवठा सुरळीत होईल. अशी माहिती आ.संदीप क्षीरसागर यांनी पिंपरगव्हाण रोड येथील सुरू असलेल्या पाईपलाईन जोडणीच्या कामाची पाहणी करून ईदगाह मैदान येथील बीड शहराला पाणी पुरवठा करणार्या प्लांट पाहणी केली.
मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन आ.संदीप भैया क्षीरसागर यांनी विविध विषयावर चर्चा आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या निर्णयाचे स्वागत करून जनतेच्या सेवेत रूजू झाले आहेत. पिंपरगव्हाण रोडवर सुरू असलेल्या पाईपलाईन जोडणीच्या कामांची पाहणी केली. शहरामध्ये 19 झोनमध्ये पाईपलाईन जोडण्याचे काम आणि छोटे-छोटे रखडलेले काम प्रगतीपथावर असून हे काम येत्या पाच ते सहा दिवसात पूर्ण होणार आहे. यामुळे बीड शहरवासीयांना आठवड्यात एकदा मुबलक पाणीपुरवठा होणारा असून जनतेने पाण्याचा वापर योग्य पद्धतीने व काटकसरीने करावा व ग्रामीण भागाकरिता सुद्धा शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत बोर/विहीर पुनर्भरण योजना सुरू केली असून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचे माध्यमातून आपले प्रस्ताव पंचायत समिती येथे दाखल करावी अशी माहिती आ.संदीप भैया क्षीरसागर यांनी दिली. याप्रसंगी माजी आ.सय्यद सलीम यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.