Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडबेपत्ता विवाहिचा विहिरीत मृतदेह कळसंबरमध्ये खळबळ

बेपत्ता विवाहिचा विहिरीत मृतदेह कळसंबरमध्ये खळबळ


नेकनूर (रिपोर्टर):- कळसंबर येथील २६ वर्षीय बेपत्ता विवाहित महिलेचा मृतदेह शिवारातील एका विहरीत आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली असून या घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्या नंतर घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छदाना साठी नेकनूरच्या रुग्णालयात आणण्यात आला आहे. सदरील विवाहितेचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप उघड झाले नसले तरी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
नेकनूर पासून जवळच असलेले कळसंबर येथील २६ वर्षीय सुवर्णा जीवन तांगडे हि विवाहित महिला काल २८ जुलै पासून बेपत्ता होती. सुवर्णा बेपत्ता झाल्याने त्यांच्या घरातील नातेवाईक यांनी तिचा शोध सुरु केला होता रात्रभर शोधाशोध करूनही सुवर्णा मिळून आल्या नाहीत या बाबतची पोलिसांना माहिती देण्यात आली मात्र आज सकाळी सुवर्णा यांचा मृतदेह कळसंबर शिवारातील विहरीत तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती तात्काळ नेकनूर पोलिसांना देण्यात आल्या नंतर पीआय लक्ष्मण केंद्रे यांनी घडानास्थळी जाऊन मृतदेह विहिरीबाहेर काडून शवविच्छेदनासाठी नेकनूर येथील रुग्णालयात पाठवला आहे. काल बेपत्ता झालेल्या विवाहित सुवर्णनांचा आज सकाळी मृतदेह विहरीत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली असून सुवर्णनाच्या मृत्यू बाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!