बीड (रिपोर्टर) गायरान जमीनधारकांना शासनाने नोटीशी बजावल्या असून हा प्रकार अत्यंत अन्यायकारक आहे. वर्षानुवर्षे अनेक कुटुंब गायरान जमीन व सरकारी जागेमध्ये रहात आहेत.
अशा लोकांना शासनाने उघड्यावर आणू नये, त्यांना दिलेल्या नोटीशी रद्द करण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी आज पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गायरान धारकांनी आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाने नगर रोड परिसर दणाणून गेला होता. हा मोर्चा अनिल तुरुकमारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.
बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गायरान जमीन व सरकारी जागेवर गोरगरीबांनी घरे बांधलेले आहेत. अशा लोकांना शासनाने नोटीशी बजावलेल्या आहेत. राज्य सरकारने नोटीशी बजावल्याने संबंधित कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोरगरीबांचे संसार शासनाने उघड्यावर आणू नये व त्यांना आहे त्याच ठिकाणी राहू द्यावे या मागणीसाठी आज पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. सदरील हा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता. या वेळी शेख फेरोज, श्रीरंग वाघमारे, अरुण सवार्स यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या मोर्चाने नगर रोड परिसर दणाणून गेला होता.