बीड (रिपोर्टर): विधानसभा निवडणुकीच्या अगोदर बीड जिल्हा परिषदेच्या
विविध विभागातील रिक्त जागांसाठी आयबीपीएस या कंपनीमार्फत लेखी परीक्षा घेण्यात आल्या. या कंपनीने परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची यादी बीड जिल्हा परिषदेला पाठविली आहे. यामध्ये अनेक विभागातील रिक्त जागा भरल्या असल्या तरी गावपातळीवर काम करणार्या आशा सेविका, पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विस्तार अधिकारी या रिक्त जागी अद्याप भरण्यात आलेल्या नाहीत. त्या तात्काळ भरण्यात येतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे या पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विस्तार अधिकारी या पदांवर भरती करण्यात आली नव्हती. या जागा तात्काळ भराव्यात, अशाही राज्य शासनाच्या लेखी सुचना आहेत, त्यामुळे लवकरच उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून या रिक्त जागा भरण्यात येतील, असेही या वेळी आदित्य जिवने यांनी सांगितले. त्यासोबतच आचारसंहितेमुळे रखडलेली कामेही लवकरच मार्गी लावण्यात येतील, असेही जिवने यांनी सांगितले.








