नेकनूर (रिपोर्टर) ग्रामीण भागासह शहरी भागात वाचनाची चळवळ निर्माण व्हावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून वाचनालय सुरू करण्यात आले. वाचनालयाला शासनाकडून दरवर्षी अनुदान दिले जाते, मात्र संबंधित वाचनालय चालक कागदावर वाचनालय दाखवून अनुदान लाटण्याचे काम करत आहे. नेकनूर येथील तीन तर परिसरामध्ये 15 ते 20 वाचनालय फक्त नावालाच असून या सर्व वाचनालयांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात वाचनालय सुरू करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातील नागरीकांना पुस्तकाच्या किंवा वृत्तपत्रातून विविध माहिती प्राप्त व्हावी व त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी वाचनालय सुरू करून त्यासाठी अनुदान देण्याचे काम शासनाने केलेले आहे. बहुतांा वाचनालय चालक अनुदानापुरते कागदावर वाचनालय दाखवत आहेत. नेकनूरमध्ये तीन तर परिसरातील बाळापूर, कुंभारी, सोनपेठ, रत्नागिगरी यासह अन्य गावांमध्ये वाचनालय फक्त नावालाच आहेत. कागदावर वाचनालय चालवणार्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.