शिरूर कासार (रिपोर्टर): तालुक्यातील पाडळी येथील अक्षय उर्फ चंद्रप्रकाश सूर्यकांत सरवदे या युवकाने दारूच्या नशेत आज शेतात घराच्या शेजारी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनला भाऊ जोतिरादित्य सूर्यकांत सरवदे यांनी दिली असून त्यानुसार अकस्मात मृत्यू दखल असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अशोक सोनवणे हे करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाडळी येथील अक्षय सरवदे याला दारूचे वेसण लागलेले होते. गेल्या महिन्याभरापूर्वी त्याचा 13एप्रिलला विवाह देखील झाला होता. मात्र त्याचे वेसण एवढे वाढले की, या वेसना पायी त्याने काल रात्री दहाच्या दरम्यान शेतातील घराजवळील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.









