50 शिक्षकांना नवीन ठिकाणी पदस्थापना देणार
बीड (रिपोर्टर) जिल्हा परिषदेमध्ये सर्वात जास्त आस्थापना असलेला शिक्षण विभाग नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. जवळपास चौदा हजार कर्मचारी या विभागात कार्यरत आहेत. आंतरजिल्हा बदलीने बीड जिल्ह्याला 13 प्राथमिक शिक्षक बदलून आलेले आहेत आणि खूप ठिकाणी एकाच शाळेवर काम केल्याने 40 शिक्षकांचे पद उडालेले आहेत. अशा जवळपास 50 ते 53 शिक्षकांना नवीन ठिकाणी पदस्थापना देण्यासाठी सीईओंच्या उपस्थितीमध्ये समुपदेशन करून या शिक्षकांना पदस्थापना देण्यात येणार आहे.
333 अपंग शिक्षकांनी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर केल्यामुळे हा शिक्षण विभाग चर्चेत आलेला आहे. तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने शिक्षण विभागाची चर्चा नेहमीच होते. अनेक कर्मचार्यांना सीईओंनी निलंबनाचा रस्ता दाखवला आहे. आज आंतरजिल्हा बदलीने बीड जिल्हा परिषदेला बीड जिल्हा परिषदेला 13 नवीन (पान 7 वर)
शिक्षक आलेले आहेत आणि लाँग स्टेमुळे 40 शिक्षक हे बदली झालेले आहेत. या शिक्षकांना पदस्थापना देण्यात आलेली नव्हती. अशा सर्व शिक्षकांसाठी सीईओ पवार यांनी समुपदेशन देऊन पदस्थापना देण्यात येणार आहे.