Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमगुत्तेदार शिक्षकाच्या घरासमोर तरुणाने विष घेतले

गुत्तेदार शिक्षकाच्या घरासमोर तरुणाने विष घेतले


गुत्त्याच्या कामात तरुणाची लाखोंची फसवणुक, अनेक वेळा पैशाची मागणी केल्यानंतरही शिक्षकाची धमकी
तरुणाने सुसाईड नोट लिहून उचलले टोकाचे पाऊल, खाजगी रुग्णालयात तरुणाची मृत्यूशी झूंज

बीड (रिपोर्टर):- गुत्तेदार असलेल्या शिक्षकांनी एका कामात आर्थिक फसवणूक केली. वेळोवेळी संबंधित शिक्षकाकडे पैसे मागूनही तो देत नसल्याचे पाहून तरुणाने थेट शिक्षकाच्या घरासमोरच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पेंडगाव येथे घडली असून सदरील विष घेतलेल्या एका तरुणावर बीडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील तरुणाने एक सुसाईड नोट लिहिली असून या सुसाईड नोटमध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक राजेंद्र पाटीलबुवा गाडे व त्यांचे बंधु विश्‍वंभर पाटीलबुवा गाडे यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

43443

दोन पानाच्या सुसाईड नोटमधून शिक्षक, गुत्तेदार हा शाळेवर न जाता ५ हजार रुपये महिन्याने त्याचे काम करण्यासाठी एका व्यक्तीस ठेवल्याचे म्हटले आहे.
विष प्राशन करणार्‍या तरुणाचे नाव हनुमान गव्हाणे असून तो शिक्षक गाडे यांच्याकडे काही दिवसांपुर्वी कामाला होता. त्यानंतर दोघात गुत्तेदारीच्या कामात पार्टनरशिप झाली. याबाबतची सविस्तर माहिती गव्हाणे याने आपल्या सुसाईड नोटमध्ये दिली असून बीड तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा परिषद मध्ये शिक्षक असेल राजेंद्र पाटिल बुवा गाडे, विश्वंभर पाटील बुवा गाडे या दोघांची नावे सुसाईड नोट मध्ये लिहिली आहेत या दोघांमुळे मी आत्महत्या करत आहे असं लिहिलं आहे.या सुसाईड नोट मध्ये राजेंद्र गाडे हा जिल्हा परिषद शिक्षक असून फक्त पगार उचलायला जातो २०१६ ते २०२० पर्यन्त एकदिवस ही शाळेत गेला नाही, त्याच्या जागेवर ५००० हजार रुपये महिना देऊन दुसरा व्यक्ती काम करत आहे. वरिष्ठ अधिकारी यांना पैशे देऊन मॅनेज करतो असा आरोप सुसाईड नोट मध्ये हनुमान ने केला आहे.
राजेंद्र गाडे यांच्या कडे हनुमान गव्हाने हा कामाला होता ,राजेंद्र गाडे हे रिलायन्स जिओ कंपनीत नवीन व्हेंडर कोड घेऊन काम सुरू केले होते त्याची माहिती नसल्यामुळे हनुमान गव्हाणे याला जिओ च्या कामासाठी २५ हजार रुपये महिन्या प्रमाणे कामाला ठेवले ठरल्या प्रमाणे सर्व काम पूर्ण करून कंपनीने दिलेलं चेक देखील राजेंद्र गाडे याना दिले मात्र १४ महिने ८ दिवसाचा पगार व इतर व्यवहाराचे मिळून ८६७३८५ रुपये पैशे शिल्लक आहेत. मागील चार वर्षा पासून हे पैशे त्याना मागत असून अद्याप पर्यंत पैशे दिले नाहीत. आज देतो उद्या देतो म्हणून फसवणूक करत आहे. पैशे मागायला घरी गेले तर जीवे मारुन टाकण्याची धमकी देत आहेत त्याच्या कॉल रेकॉर्ड आहेत असे सुसाईडमध्ये लिहिले आहे. शेवटी कंटाळून राजेंद्र गाडे या शिक्षकांच्या घरासमोर विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला,विषारी औषध जास्त असल्यामुळे हनुमान अद्याप शुद्धीवर नाही. प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हा परिषद शिक्षक राजेंद्र गाडे यांच्याशी संपर्क केला असता बोलण्यास नकार दिला. फोनवर देखील मला काही बोलायचं नाही मी माझ्या परीने पाहतो म्हणत कॉल कट केला.शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात मध्ये काम करणार्‍या गुरुजीं शासनाचा पगार उचलून दुसरीकडे गुत्तेदारी करत असताना बेरोजगार तरुणाचा पैसे पडल्यामुळे या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात असून शाळेत न जाता पगार उचलणार्या गुरुजी वर कारवाई करण्याची मागणी देखील नातेवाईक करत आहेत तसेच उद्या हनुमानचे काही बरेवाईट झाल्यास राजेंद्र गाडे हे जबाबदार असतील असे देखील नातेवाईकांनी सांगितले.

Most Popular

error: Content is protected !!