बीड (रिपोर्टर)ः-बीड शहरात विविध ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याची माहिती एस.पी.चे पथक प्रमुख विलास हजारे यांना मिळाली होती. त्यावरुन त्यांनी धाड सत्र सुरू करत 19 जून रोजी यशराज हॉटेल येथे एका पत्र्याच्या टपरीमध्ये छापा मारला असता चार मटका बुकींना ताब्यात घेतले. दुसरी कारवाई शिवराज पान सेंटरच्या पाठीमागे जुन्या लक्ष्मी हॉटेच्या खुल्या गाळ्यामध्ये करण्यात आली. यामध्ये 6 इसमांना ताब्यात घेतले. तिसरी कारवाई 20 जून रोजी करण्यात आली. ही कारवाई पेठ बीड भागातील एकता चिकन शॉपच्या शेजारी करण्यात आली. एकुण 5 जुगार्यांना ताब्यात घेतले. या सर्व जुगार्यांकडून लाखोचा मुद्देमाल करुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बीड शहरात अवैध धंद्यांवर विशेष पथकाने धाड सत्र सुरू केले. दोन दिवसात तिन ठिकाणी धाड टाकली. पहिली धाड गौरव हॉटेलच्या बाजूला असलेल्या यशराज हॉटलेमध्ये टपरीमध्ये टाकण्यात आली. यावेळी चार जुगार्यांना ताब्यात घेतले. त्यांमध्ये निलेश कैलास शिंदे, रा.वरवटी, श्रीराम देवीदास जोगदंड, रा.वरवटी, भारत विठठलराव देवतरासे, रविंद्र रमेश जाधव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रकमेसह 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई शिवराज पानसेंटरच्या बाजूला असलेल्या लक्ष्मी हॉटेलच्या खुल्या गाळ्यामध्ये करण्यात आली. यामध्ये शिवाजी दिलीप अंकुशे, सुभाष एकनाथ चंदनशिव, विलास रंगनाथ कडवकर, मारोती अण्णासाहेब मोरे, कचरु सुखदेव लोंढे, मोहन रामभाऊ वैद्य, यांच्यावर करण्यात आली. ते जुगार खेळतांना रंगेहाथ पकडले. तर दोन आरोपी पळून गेले. यांच्याकडून 25 हजार 90 रुपयांचा मुद्ेमाल जप्त करण्यात आला. तिसरी कारवाई पेठबीड भागात करण्यात आली. यावेळी राजू आश्रुबा कोकाटे, अंकुश भिकू जोगदंड, राजेश बंशीराम परदेशी, सय्यद मोईयोनोद्दीन सय्यद बद्रोद्दीन, दिलीप रामभाऊ शिंदे, या पाच जणांना जुगार खेळतांना पकडले. त्यांच्याकडून 32 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख विलास हजारे, पो.शि. सचिन काळे, शिवाजी डिसले, विनायक कडू यांनी केली.