Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडअज्ञात वाहनाच्या धडकेत हॉटेल कामगाराचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत हॉटेल कामगाराचा मृत्यू


बीड (रिपोर्टर):- गेवराईकडूएन बीडकडे दुचाकीवरून येणार्‍या हॉटेल कामगाराला ढोकवडगाव जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रात्री साडेअकराच्या दरम्यान घडली असून जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संतोष हिमला वल्ली (वय २६, रा नेपाळ ह.मु.गेवराई) हा मजूर गेल्या काही दिवसांपासून पाडळसिंगी टोलनाक्याच्या अलिकडे असलेल्या त्रिमुर्ती हॉटेलमध्ये कामाला होता. तो गेवराईवरून हॉटेलवर दुचाकीवरून ये-जा करत होता. काल रात्री साडेअकराच्या सुमारास तो गेवराईकडून कामासाठी हॉटेलवर येत असताना ढोकवडगाव जवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. झालेल्या भीषण अपघातात वल्ली याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाला. घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन जिल्हा रुग्णालयात अपघातातील जखमीला दाखल केले. संतोष वल्ली याला डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले तर अन्य एकावर उपचार सुरू आहेत.

Most Popular

error: Content is protected !!