शासनाने जाहीर केलेली मदत कधी वाटप करणार
बीड (रिपोर्टर): अतिवृष्टी आणि पिक विम्याचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. शासन फक्त शेतकर्यांना आश्वासन देत आहे. शासनाने आश्वासनाची पूर्तता केली नसल्याने किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ घालून राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी अनेक शेतकर्यांची उपस्थिती होती.
2022 चे थकित अतिवृष्टीचे अनुदान अद्यापही वाटप करण्यात आलेले नाहीत. ते वाटप करण्यात यावे, जाहीर केलेली दीड हजार कोटींची मदत शेतकर्यांना तात्काळ द्यावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ करून शासनाचा निषेध करण्यात आला. या वेळी अॅड. अजय बुरांडे, काशीनाथ सिरसट, मुरलीधर नागरगोजे, कॉ. घाडगे, दत्ता डाके, गंगाधर पोटभरे, भगवान बडे, जगदीश फरताडे, विष्णू देशमुख, कृष्णा सोळंके, दादासाहेब सिरसाट यांच्यासह आदी शेतकर्यांची उपस्थिती होती.