नव्या प्रभार्यांना ठाणे मिळताच हप्त्याची रक्कम दुप्पट
धाबे, हॉटेलचालक वैतागले, 2 हजारांचा हप्ता थेट चार हजारावर
बीड (रिपोर्टर):-
गेल्या काही दिवसांपूर्वी बीड पोलिस दलात खांदेपालट झाले. अनेकांनी ठाणे मिळविण्यासाठी जोर लावला होता. ज्याला ठाणे प्रमुख म्हणून संधी मिळाली त्यांनी मात्र आता आपल्या हद्दीत सुरु असलेल्या वैध- अवैध धंद्यावाल्यांना सक्त ताकित दिली आहे. पुर्वी दोन हजाराचा हप्ता धाब्यावाले देत होते. मात्र आता तुम्हाला धंदा सुरु ठेवायचा असेल अन् कारवाई होवू द्यायची नसेल तर दोन नव्हे चार हजार रुपये हाप्ता द्यावा लागेल असे म्हणून ताकीद दिली अहे. मात्र धाबेचालकांनी अद्याप हप्ते दिले नाहीत. येत्या काही दिवसात वाढीव हप्ता दिला नाही तर अनेक धाब्यांवर कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. याकडे पोलिस अधिक्षकांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी बीड जिल्हा पोलिस दलात खांदेपालट झाले. यावेळी अनेक ठाणेदारांची उचलबांगडी झाली तर काही जणांना ठाणेप्रमुख म्हणून संधी मिळाली. मात्र याला महिना होत नाही तोच. सर्व अवैध धंद्यावाल्यांना आणि सरळ मार्गाने व्यावसाय करणार्यांना बीडच्या ठाणेप्रमुखांनी आपल्या एका शिपायामार्फत सक्त ताकीद दिली आहे. की यापूर्वीच्या हपत्यामध्ये वाढ करावी लागले. आणि आता येणारा हप्ता चार हजार रुपये द्यावा लागेल तरच तुम्हाला धाबे सुरु ठेवता येतील अन्यथा आमच्याकडे अनेक नियम आहेत तुमचे धंदे बंद करण्याचे. असे म्हणून सरळ सरळ हाप्ते द्या अन् अवैध धंदे सुरु करा असे या ठाणेप्रमुखांनी फर्मान काढले आहे.
आता कारवाया होणार का?
जर या धाबेचालकांनी दोन हजार रुपया एैवजी चार हजार रुपये हप्ता दिला नाही तर त्यांच्यावर कारवाई होणार का? कारवाया झाल्या तर हाप्ता वाढविण्यासाठीच होणार अन् नाही झाल्या तर हाप्ता चार हजार रुपये मिळणार हे मात्र नक्की
ठाणे प्रमुख चार हजारावर ठाम,
हॉटेलचालक म्हणतात अडिच हजार रुपये देणार
अनेक ठिकाणी पदाभार घेताच ठाणेदार हद्दीत कारवाया करतात. अन् सर्व माहिती गोळा करुन घेतात. मात्र गेल्या महिन्यात ठाणेमिळालेल्या जवळपास अनेकांनी धाडसत्र सुरु केले नाही. त्यातील काही ठाणेदारांनी तर पहिल्यापेक्षा थेट दुप्पट मलिदा मागीतला. यामध्ये हॉटेलचालकांनी आम्ही दुप्पट नाही पण तुमच्या सन्मानासाठी पाचशे रुपये वाढवून देवू त्यापलीकडे आम्ही देवू शकत नाही. अगोरदच हॉटेलचा किराया 40 ते 50 हजार रुपये, त्यात कर्मचारी, आचारी अन् हॉटेल खर्च आम्ही कसा भागवायचा अन् घरी काय द्याचे सांगा साहेब असे म्हणत अनेकांनी वसुली करणार्यांपुढे गर्हाणे मांडले आहे. मात्र साहेब एैकत नाहीत ते चार हजारच मागतात असे तो वसुली करणारा कर्मचारी सांगत आहे.
एसपी साहेब चौकशी कराच
आपल्या हद्दीतील अवैध धंदे रोखण्याचे काम पोलिसांचे आहे. मात्र हेच पोलिस हप्ता वाढवून द्या अन् खुशाल अवैध धंदे करा. असे अलिखीत फर्मान काढले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होवू शकतो. एसपी साहेब आपल्याला जिल्ह्यात शांतता हवी असेल तर हे प्रकरण गांभीर्याने घ्या अन् चौकशी लावून हाप्ते घेणार्या ठाणेप्रमुखांची उचलबांगडी कराच