शहरातील खड्ड्यात बेशरमचे झाड लावून केला निषेध
बीड (रिपोर्टर): बीड शहरातील काही ठिकाणी रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना आपली वाहने व्यवस्थीत चालवता येत नाही. स्वराज्य पक्षाच्या वतीने आज शहरातील खड्ड्यात बेशरमची झाडे लावून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. या वेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
शहरामधील विविध भागात नगर पालिका प्रशासनाने व्यवस्थीत रस्ते बनवलेले नाहीत. रस्तेअभावी नागरीकांना त्रासाला सामोरे जावे लागले. पावसाळ्याच्या दिवसात खड्ड्यात पाणी जमा झाल्याने नागरीकांसह लहान मुलांना त्रास सहन करावा लागतो. आज छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या वतीने शहरामध्ये खड्डे बुझवा अपघात वाचवा आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये बेशरमचे झाडे लावून पालिका प्रशासनाचा निषेध केला. या वेळी शिवराज माने, सुरज जायभाये, चंद्रशेखर कदम यांच्यासह आदींची उपस्थिती होती.