कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 10 लाखांचा धनाकर्ष सुपूर्द
मुंबई (रिपोर्टर); राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी रायगड जिल्ह्यातील दुर्घटना घडल्यामुळे त्यांचा वाढदिवस साजरा न करता ईरशाळवाडी या गावाच्या उभारणी करण्याकरीता सहकार्य करावे हे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच परळी नगर पालिकेचे गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी राष्ट्रवादी काँग्रेसने 10 लक्ष रुपये निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला.
आज विधिमंडळात मुख्यमंत्री दालनात कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत 10 लाख रुपयांचा धनाकर्ष मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय दौंड, बीड जिल्हाध्यक्ष ड.राजेश्वर आबा चव्हाण,ज्येष्ठ नेते राजकिशोर उर्फ पापा मोदी, परळी चे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,ज्येष्ठ नेते राजपाल लोमटे, अंबेजोगाई तालुकाध्यक्ष तानाजी देशमुख,युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गोविंद कराड,माजी नगरसेवक राजेंद्र सोनी,जितेंद्र नव्हाडे,संदीप दिवटे,सचिन कराड,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांना प्रभू वैद्यनाथांची प्रतिमा भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभुवैद्यनाथांची प्रतिमा भेट देण्यात आली, तसेच परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकास कार्याच्या वाढीव 288 कोटींच्या योजनेस मंजुरी दिल्याबद्दल सर्व उपस्थितांनी मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त केले.