तदारुडा पोलीस अद्याप फरार
बीड/धारूर (रिपोर्टर): कर्तव्यावर असताना दारूच्या तर्र नशेत एा महिलेच्या घरात घुसून तिला पाचशेची नोट दाखवून हात धरल्याची खळबळजनक घटना धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणी संतप्त नातेवाईकांनी त्या दारुड्या पोलिसाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन सहीलामत कर्मचार्याला तेथून घेऊन गेले. नातेवाईक आक्रमक होताच काल रात्री त्या पोलीस कर्मचार्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तकडकाफडकी एसपींनी त्याच्या निलंबनाचे आदेश काढले. मात्र दस्तुरखुद्द ठाणेप्रमुख त्या दारुड्या पोलिसाला घेऊन गेले असताना आरोपी पोलीस त्यांच्या तावडीतून पळून जातोच कसा? याबाबत धारूर पोलिसांच्या कार्य प्रणालीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोगलवाडीचे बिट अंमलदार संजय गुंडे हे कर्तव्यावर असताना परवा आपल्या बिटातील एका गावात तर्र नशेत गेले. रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान एका महिलेच्या घरात घुसून तिला पाणी मागितले. त्यानंतर तिला पाचशेची नोट दाखवून तिचा हात धरला. घाबरलेल्या महिलेने पोलीस कर्मचार्याचा हात हिसकावत घराबाहेर येऊन आरडाओरड केली. त्यानंतर जमलेल्या गावकर्यांनी त्या पोलीस कर्मचार्याला चांगलाच चोप दिला. रात्री एक ते दीडच्या नंतर ठाणेप्रमुख विजय आटोळे यांनी घटनास्थळी येऊन दारुड्या पोलिसाला सहीसलामत घेऊन गेले. त्यानंतर मात्र त्याच्यावर कसलीच कारवाई झाली नाही. दुसर्या दिवशी सकाळी ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर धारूर पोलिसांनी जास्तीचा बंदोबस्त बोलावत ग्रामस्थांना ठाण्याबाहेर काढले. त्यानंतर उशीरा त्या कर्मचार्यावर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच एसपींनी त्याच्या निलंबनाचे आदेश काढले.
धारूर पोलिसांनीच आरोपी सोडला
तर्र नशेत असलेल्या पोलीस आरोपी संजय गुंडेला ठाणेप्रमुखांनी संतप्त गावकर्यांच्या तावडीतून सहीसलामत ठाण्यात नेले. त्यानंतर उशीरा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र पोलिसांनी आरोपी फरार असल्याचे दाखवले. गुन्हा दाखल होऊन दुसर्या दिवशीही पोलिसांना आरोपी सापडत नाही. त्यामुळे धारूर पोलिसांनीच आरोपी सोडून दिल्याचे स्पष्ट होत आहे. तसा नातेवाईकांचाही आरोप आहे.