वाचळवीर भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत नोंदवला निषेध
दिंद्रुड (रिपोर्टर) : महामानवासंदर्भात अवमानकारक वक्तव्य करणार्या समाजद्रोही संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत दिंद्रुड येथे वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने मनोहर भिडे यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
याबाबत सविस्तर अशी की फुले शाहू आंबेडकरांचा समजल्या जाणार्या महाराष्ट्रामध्ये समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करून संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी या व्यक्तीने संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण बिघडून टाकण्याचे काम केलेले आहे.मागच्या काही दिवसापूर्वी संभाजी महाराज बद्दल केलेले वक्तव्य ,15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आम्हाला मान्य नाही, महात्मा गांधी यांचे वडील मुस्लिम आहेत,महात्मा ज्योतिबा फुले हे नावालाच समाज सुधारक होते व भारतातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा बद्दल हा फकीर माणूस आज देव होऊन बसला असे वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण दूषित करणार्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी नावाच्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ अटक करण्यात यावे या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेच्या वतीने मनोहर कुलकर्णी यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला या आंदोलनास डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया भीम आर्मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी पाठिंबा दिला होता.यावेळी डी पी आय चे माजलगाव तालुका अध्यक्ष नवनाथ कांबळे,सामाजिक कार्यकर्ते बाबा कांबळे व भीम आर्मीचे बीड जिल्हाप्रमुख सिद्धार्थ मांयदळे यांनी आपल्या भाषणातून निषेध नोंदवला.
या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे माजलगाव तालुका उपाध्यक्ष राजेभाऊ कटारे यांनी केले. या आंदोलनास रिपाईचे बाबा देशमाने, भीम आर्मीचे सचिन देशमाने, डीपीआयचे मंगेश काळे,सामाजिक कार्यकर्ते अविनाश घायाळ व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.