Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमकमी भावात सोने देतो म्हणत परळीच्या सराफाला 40 लाखांना गंडवले

कमी भावात सोने देतो म्हणत परळीच्या सराफाला 40 लाखांना गंडवले


परळी (रिपोर्टर)- कमी भावामध्ये सोने खरेदी करून देतो, म्हणत दोन भामट्यांनी परळी येथील 30 वर्षीय सराफा व्यापार्‍यास गेल्या वर्षभराच्या कालखंहात तब्बल 40 लाख रुपयांना गंडवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी परळी तालुक्यातील नंदागौळ येथील एकास व औरंगाबाद येथील एका आरोपीविरोधात कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापार्‍याकडून या दोन भामट्यांनी 40 लाखांची रक्कम वसूल केल्यानंतर आजपावेत त्या व्यापार्‍याला ना पैसे ना सोने दिले. विशेष म्हणजे यातील एक आरोपी हा व्यापार्‍याचा मित्र आहे.

याबाबत अधिक असे की, परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील शंकर प्रभाकर शहाणे यांचे परळी येथे सोनार लाईनमध्ये सोमेश ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. गेल्या वर्षी 8-10-2020 रोजी शंकर याचा मित्र महादेव उद्धव गिते (रा. नंदागौळ) याने ‘तुला चालू भावापेक्षा कमी भावामध्ये सोने देतो, माझा औरंगाबाद येथील मित्र प्रशांत भालेकर हा त्याचा मुंबई येथील मित्र हा होलसेल सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो, तो तुला बर्‍याच कमी भावाने सोने देईल,’ असे म्हटल्यानंतर शंकर शहाणे यांनी औरंगाबाद येथे जावून महादेव गिते व औरंगाबाद येथील प्रशांत भालेराव याला प्रथम 15 लाख व नंतर 25 लाख असे एकूण 40 लाख रुपये दिले. गेल्यावर्षीच्या ऑक्टोबरमध्ये हे पैसे दिल्यानंतर सोने आज-उद्या, आज-उद्या देतो म्हणत आजपर्यंत या दोघांनी चालढकल केली. मुंबईतील व्यापारी हा बाहेरगावी गेला आहे, तो मुंबईत परतल्यानंतर सोने देणार आहे, असे वेळोवेळी सांगितले. मात्र सोने आणि पैसे मिळत नसल्याचे पाहून आपण नंदागौळ येथे महादेव गिते याच्या घरी गेलो, परंतु तेव्हाही ते पैसे देत नसल्याचे पाहून आपली फसगत झाल्याचे लक्षात आले. म्हणून अखेर वर्षभराच्या कालखंडानंतर शंकर शहाणे यांनी परळी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात कलम 420, 34 भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सपकाळ हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!