परीक्षार्थ्यांत संताप; बीडला एक तर अंबाजोगाईत दोन सेंटर, दुपारी दोन वाजता परीक्षा होणार
बीड (रिपोर्टर): राज्यभरामध्ये तलाठीच्या परीक्षा सुरू आहे. आज राज्यातील काही सेंटरमध्ये सकाळी पेपरला सुरुवात होणार होती. मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा होऊ शकली नाही. सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यात संताप व्यक्त केला जात होता. बीडमध्ये एक आणि अंबाजोगाईमध्ये दोन सेंटरवर परीक्षा घेण्यात येत आहे. बीडसह नागपूर, अमरावती, अकोला, लातूर यासह आदी ठिकाणीही सर्व्हर डाऊन झाला होता. सर्व्हर पुर्णवत झाल्याने आता दुपारी दोन वाजता पेपर घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. परीक्षेचे टेंडर एका खासगी कंपनीला देण्यात आलेले आहे.
राज्यभरात तलाठी पदाच्या परीक्षा सुरू असून त्या आधी सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या सर्वांमुळे विद्यार्थी आक्रमक झाले असून राज्यातील जवळपास सर्वच ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती असल्याचे चित्र आहे. नागपूर, अमरावती, अकोला, लातूर आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. आता दुपारी दोन वाजता परीक्षा होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
प्रशासकी पातळीवरुन करण्यात आलेल्या नियोजनावर विद्यार्थांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासकीय व्यवस्था विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत गंभीर नाही का? असा सवाल या विद्यार्थांनी उपस्थित केला आहे. या सर्वांमुळे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. नागपुरात तलाठी भरती परिक्षेत सर्व्हर डाऊन झाला आहे. तर केवळ नागपुरातच नाही तर राज्यभरातील अकोला, अमरावती, लातूरमध्येही काहीशी अशीच परिस्थिती दिसून येत आहे.
अमरावती केंद्रावर आज तलाठी पदासाठी ऑनलाईन परीक्षा होणार होती. प्रशासनाने दिलेल्या वेळेनुसार सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थांना परीक्षाच देता आली नाही. त्यामुळे आपल्या भविष्याची चिंता विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरच गोंधळ घातला. या वेळी विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अशीच स्थिती राज्यभरातील परीक्षा केंद्रावर पाहायला मिळाली. बीड येथे एक आणि अंबाजोगाई येथे दोन केेंद्रांवर तलाठीच्या परीक्षा घेण्यात येत आहे. बीडमधील नागनाथ इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या केेंद्रामध्ये परीक्षा होत आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सदरील परीक्षार्थींनी संताप व्यक्त केला होता. या ठिकाणावर इतर जिल्ह्यातून परीक्षार्थी परीक्षेसाठी आले होते.