Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडआ. विनायक मेटेंनी केली केज, अंबाजोगाईतील नुकसानीची पाहणी

आ. विनायक मेटेंनी केली केज, अंबाजोगाईतील नुकसानीची पाहणी

ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्या -आ. मेटे

बीड (रिपोर्टर)- मराठवाड्यात अतिवृष्टी आणि वादळी वार्‍यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना महापूर आल्याने शेतकर्‍यांचं अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधवांचं उभं पीक वाहून गेल्याचं आणि शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमिनीवर मोठमोठे खड्डे पडल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर आ.विनायकराव मेटे यांनी आज केज व अंबाजोगाई येथील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी केली.


अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातील ऊस, सोयाबीन, कपाशी, उडदाचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्ण अडचणीत आलेला असून शेतीचे नुकसान झाले आहे. शेत पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खोलीकरण नसल्यामुळे पाणी सगळ्या शेतांमध्ये आलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करुन सॅटलाईटद्वारे उपलब्ध असलेल्या नुकसानीच्या माहितीच्या आधारे तातकाळ मदतीची घोषणा करावी, अशी मागणी शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांनी केली आहे. गेल्या दोन दिवसापासून आ.मेटे हे बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करत आहेत.आज सावळेश्वर- पैठण, बनसारोळा आपेगाव ,ईस्तळ येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी व नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यामध्ये सावळेश्वर पैठण येथे गेल्या पंचवीस वर्षात झाला नव्हता एवढा पाऊस यावेळेस झाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नदीपात्राच्या बाहेरही पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने नदीकाठच्या कच्चे घर व पत्र्याचे शेड वाहून गेले आहेत. अनेक घरातअनेक घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड झालेली आहे.
सावळेश्वर पैठण येथील शेतकर्‍यांची तीन पशुधन पुरात वाहून गेलेली आहेत. विद्युत पोल व तारा ऊन्मळून पडलेल्या आहेत.इतकी नाजूक परिस्थिती असतानाही शासकीय यंत्रणा पंचनामे साठी येथे अद्याप आलेली नाहीत. यावर आ. मेटे यांनी तात्काळ तहसीलदारांना फोन करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आपेगाव ता. अंबाजोगाई येथील ग्रामस्थांनाही पुराचा फटका बसलेला आहे. अनेक घरांची पडझड झाली असून जवळपास ९३ पशुधन पुरामध्ये वाहून गेलेली आहेत, आपेगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्र बंद अवस्थेत आहे, नदी किनार्‍यावरील पत्र्याची शेड पुरात वाहून गेलेले आहेत त्यामुळे ग्रामस्थांना जबर आर्थिक फटका बसलेला आहे. सोयाबीनच्या गंजी पुरात वाहून आल्यामुळे सडून गेलेले आहेत, परिसरात दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाप्रकारे अनेक ग्रामस्थांनी आ.मेटे साहेबांकडे आपली कैफियत मांडली. शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकर्‍यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन यावेळी आ.विनायकराव मेटे यांनी दिले. मागील कांही दिवसांपासून राज्यात कोसळणार्‍या पावसामुळे शेतकर्‍यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना आधाराची गरज आहे.शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तात्काळ मदतीची घोषणा करणे अपेक्षीत आहे. अशावेळी मा.मुख्यमंत्र्यांनीअजूनही मदतीची घोषणा केलेली नाही,मा.मुख्यमंत्र्यांना अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकर्‍यांसाठी मदत जाहीर करण्यास एवढा वेळ कशासाठी लागत आहे.?असा प्रश्न आ. मेटे यांनी यावेळी उपस्थित केला. पावसामुळे राज्यात प्रचंड शेती आणि मालमत्तेचं नुकसान झाले आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जनावरं वाहून गेल्याच्या आणि मृत्यूच्या घटना घडल्या. यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक नागरिकांना संकटांनी तोंड द्यावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी ही सगळी परिस्थिती गांभीर्याने घेऊन तात्काळ मदतीची घोषणा करायला हवी,शासनाकडे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा सॅटॅलाइट डाटा उपलब्ध आहे,नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यांना थेट मदत दिली पाहिजे. त्यमुळे उगाच पंचनाम्यात वेळ घालवू नये. कारण मागील वेळी पंचनामे केलेली रक्कम अजूनही शेतकर्‍यांना मिळालेली नाही. कागदी घोडे नाचविण्यात काहीही अर्थ नाही,असा आ.विनायकराव मेटे यांनी मा.मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.या पाहणी दरम्यान जि प सदस्य सो.योगिनीताई थोरात,युवक जिल्हाध्यक्ष रामहरीभैय्या मेटे,केज तालुकाध्यक्ष केशवराव कदम, ज्येष्ठ नेते लिंबराज वाघ,महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस साक्षीताई हांगे,ज्येष्ठ नेते चंद्रकांत शिंदे,नामदेवराव गायकवाड, शिवाजीराव वाघमारे,अंबाजोगाई तालुका अध्यक्ष सुनील आर्सूळ,विनोद कवडे,अल्पसंख्यांक नेते फिरोज पठाण,खामकर ताई,धनेश गोरे,गणेश साबळे,सुनील कुटे,अड सुधिर चौधरी,सावळेश्वर चे सरपंच पिंटू मस्के, अशोकराव काकडे,भागवतराव गोरे, राजपाल काकडे, गोविंद शिनगारे तसेच विविध गावचे सरपंच चेअरमन ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते तलाठी ग्रामसेवक इत्यादी उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!