एकतर आरक्षणाची विजयी यात्रा नसता माझी अंत्ययात्रा -मनोज जरांगे
गेवराई (रिपोर्टर): साहेब तुमचं मी याआधी ऐकलं, तुम्ही शब्द दिला होता मात्र समितीने मराठा आरक्षणासाठी काही केलं नाही. मराठ्यांसाठीचा जो जीआर काढतो म्हणाले होते, तो काढला नाही. प्रत्येक वेळा तुम्ही सांगता, मी ऐकतो, मी लोकांसाठी आणि आरक्षणासाठी लढतो म्हणून माझा फेस काढणार का? असा थेट सवाल मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारलाय. काल सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संभाषण केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या संभाषणानंतरही जरांगे यांनी आपले उपोषण सुरुच ठेवले आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी शहागड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हजारोंच्या उपस्थितीत मराठ्यांनी मराठा आरक्षण आणि कुणबी व मराठा एकच आहेत, त्याबाबत कुणबीप्रमाणे मराठवाड्यातील मराठ्यांना सलवती देण्याबाबतच्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. आजचे आज मागण्या मंजूर न झाल्यास लगेच उपोषणाचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता.
त्यानुसार
जरांगे यांनी सराटे अंतरवली या ठिकाणी उपोषण सुरू केले आहे. काल सायंकाळच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जरांगे पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आणि उपोषण सोडण्याबाबत विनंती केली मात्र गेल्या तीन महिन्यांपासून ज्या कमिटीची स्थापना झाली आहे त्या कमिटीने कुठलेही काम केले नाही, निर्णय घेतलेला नाही, असं म्हणत जोपर्यंत कमिटी निर्णय घेत नाही, राज्य सरकार जीआर काढत नाही, तोपयर्ंत आपण उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुमच्या मागण्यांची दखल मी घेतली आहे, कमिटीला तात्काळ बोलवतो, असे म्हणून उपोषण सेडण्याचे सांगितले, मात्र मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर पाणी घेऊन उपचार घेण्याची तयारी सध्या जरांगे यांनी दाखविली आहे. मात्र ते उपोषणावर ठाम असून अद्यापपर्यंत त्यांचे उपोषण सुरू होते. याबाबत मनोज जरांगे यांनी एकतर मराठा आरक्षणाची विजयी यात्रा नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल, असा आक्रमक पवित्रा त्यांना घेतला आहे.
गेवराई शहर बंदची हाक
गेल्या दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षण मागणीसाठी शहागड येथील पैठण फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट जण आक्रोश आंदोलन संपन्न झाले. मात्र यानंतरही सरकारने कुठलाच निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंबड तालुक्यातील अंतरवली साराटी येथे आमरण उपोषण सुरू केले असून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या दि. 01 सप्टेंबर रोजी गेवराई शहर बंद ची हाक देण्यात आली आहे. आज दि.31 रोजी 11 वा.शहरातील बेदरे लॉन्स येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वानुमते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन देऊन गेवराई बंद ची हाक देण्यात आली. या आवाहनाला व्यापारी महासंघानेही पाठिंबा दिला आहे.