गोरक्षनाथ टेकडीवर सद्गुरु संत किसन बाबा यांच्या रौप्य महोत्सवी लोटला भक्तांचा सागर
बीड । रिपोर्टर
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे सद्गुरु संत किसन बाबा यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळा सुरु असून आज दि 31 रोजी दुपारी 11 ते 1 या वेळेत श्री.ह भ.प रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर यांचे सुश्राव्य काल्याचे किर्तन झाले.
सद्गुरु संत किसन बाबा यांच्या रोप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवाची मोठ्या थाटात सांगता झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते.
काल्याच्या कीर्तनानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.
महाप्रसाद वाटपासाठी गोरक्षनाथ टेकडी परिसरातील भाविकांनी व स्वयंसेवकांनी सेवा दिली. त्यासाठी प्रत्येकाने ट्रॅक्टर स्वच्छ धुऊन गोरक्षनाथ टेकडीवर आणले होते.