अंबाजोगाई (रिपोर्टर): धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाज बांधवांच्या वतीने बसस्थानकासमोर काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. संतप्त आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
धनगर समाजाला हक्काचे आरक्षण देण्यात यावे, धनगड आणि धनगर हे एकच आहेत. त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचीत जमातीमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून धनगर समाजाची आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते, मात्र तेे आजपावेत पुर्ण केले नाही. त्यामुळे धनगर समाजाचे आंदोलन राज्यभरात होत आहेत. आज अंबाजोगाई येथील बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही काळ वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता.