Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमउपजिल्हाधिकारी आघाव पाटील यांच्या अडचणी वाढल्या जमीन घोटाळ्याप्रकरणी बीडच्या न्यायालयाने जामीन अर्ज...

उपजिल्हाधिकारी आघाव पाटील यांच्या अडचणी वाढल्या जमीन घोटाळ्याप्रकरणी बीडच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यातील देवस्थानाच्या जमीनीत मोठ्या प्रमाणात अफरातफर झाली असून या प्रकरणात बीडचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी आघाव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांनी बीडच्या न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने आघाव यांच्या अडचणी वाढल्या आहेत.


     आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील देवस्थान जमीन घोटाळ्यातील आरोपी बीडचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी आघाव पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आघाव पाटील यांना बीड न्यायालयाने अंतरीम जामीन दिला होता. या अंतरीम जामीनावर दोन वेळेस सुनावणी होऊन शुक्रवारी ही सुनावणी पुर्ण होऊन निकाल राखीव ठेवण्यात आला होता. आज बीड न्यायालयाने आघाव पाटील यांचा अंतरीम जामीन रद्द केला आहे. त्यांना कोर्टाने पोलीस कस्टडी दिली की न्यायालयीन कस्टडी हे मात्र स्पष्ट झालेले नाही. याच प्रकरणात तत्कालीन उपजिल्हाधिकारी नरहरी शेळके यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी औरंगाबाद येथून त्यांना ताब्यात घेतले होते. पंधरा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर दोन दिवसांपुर्वीच त्यांचा जामीन झालेला आहे. दरम्यान आघाव पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. चिंचपूर देवस्थान घोटाळ्यासोबतच प्रकाश आघाव पाटील यांनी जिल्ह्यात इतर देवस्थानाच्या जमिनीत अफरातफर केलेली आहे. या देवस्थानांच्या जमीनीप्रकरणी एकूण 15 जणांवर गुन्हे दाखल झाले असून आघाव पाटील यांचा जामीन फेटाळल्यानंतर देवस्थान जमीनीत ज्यांनी ज्यांनी घोटाळे केलेले आहेत त्यांचे धाबे दणाणले आहेत. देवस्थानाच्या जमीनी घेणार्‍या-देणार्‍यात मोठी खळबळ माजली आहे.

Most Popular

error: Content is protected !!