माजलगाव (रिपोर्टर)- जालणा जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून तहसील समोर अमरण उपोषण चालू होते.हे उपोषण मंगळवार रोजी स्थगित करण्यात आले अमर उपोषण ऐवजी एक महिना ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. बुधवार रोजी उमरी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले.ठिय्या आंदोलन करणार्या आंदोलकांना येथील तिरूपती अर्बन बँकेच्या वतीने नाष्टा देण्यात आला.
तहसील समोर गेल्या सात दिवसापासून अमरण उपोषण चालू होते आमरण उपोषण स्थगित करून एक महिनाभर ठिय्या आंदोलन होणार आहे यात पहिल्या दिवशी उमरी येथील सकल मराठा समाजाच्या बांधवांनी या आंदोलन केले. उमरी येथील सकल मराठा समाजाच्या बांधवांनी बुधवार रोजी सकाळी उमरी ते माजलगाव मोटरसायकल रॅली काढून सकाळी दहा ते पाच तहसील समोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलन केलेल्या आंदोलनकांना येथील तिरुपती अर्बन बँकेच्या वतीने नाश्त्याची सोय केली होती या आंदोलनाला माजलगाव येथील अनेकांनी पाठिंबा देऊन ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला.