Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडसहमतीचा भ्रष्टाचार मोठा -पोलीस अधिक्षक आर.राजा भ्रष्टाचार समाजाला लागलेली किड-ठोंबरे

सहमतीचा भ्रष्टाचार मोठा -पोलीस अधिक्षक आर.राजा भ्रष्टाचार समाजाला लागलेली किड-ठोंबरे

बीड (रिपोर्टर):- भ्रष्टाचार दोन प्रकारचा आहे. एक जबरदस्तीने करप्शन आणि दुसरा प्रकार म्हणजे सहमतीचा भ्रष्टाचार. सहमतीचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो. लाचलुचपत विभागाने मोठे मासे पकडले पाहिजेत असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक आर.राजा यांनी केले. भ्रष्टाचार हा समाजाला लागलेली कीड असून ती कीड कायमची नष्ट करण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोबरे यांनी दिली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आज भ्रष्टाचार निर्मुलन दक्षता जनजागृती सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आर.राजा व ठोंबरे बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना आर.राजा म्हणाले की, समाजामध्ये भ्रष्टाचार दोन प्रकारचा असून एक भ्रष्टाचार सहमतीचा आहे आणि दुसरा जबरदस्तीचा आहे. सहमतीचा भ्रष्टाचार मोठा असून या प्रकरणात मोठ्या व्यक्ती विरोधात कारवाया व्हायला हव्यात असे सांगत ते पुढे म्हणाले की, सर्वांनी नियमाचे पालन केले तर भ्रष्टाचार होणार नाही. मात्र दुर्दैवाने नियमाचे पालन होत नाही. परदेशात नियमाचे पालन होत असल्याने त्या ठिकाणी भ्रष्टाचार कमी आहे. जास्तीत जास्त लोकांचा संपर्क आल्यामुळे भ्रष्टाचार वाढतो. टेक्नॉलॉजीचा जास्त वापर झाला तर भ्रष्टाचार कमी होईल असे त्यांनी यावेळी म्हटले. अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले की, लोकांची कामे वेळेत होतात का? का विनाकारण विलंब होतो याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष दिले पाहिजे. भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. एक दिलाने काम केल्यास भ्रष्टाचार कमी होवू शकतो असे ठोंबरे यांनी म्हटले आहे. यावेळी भारत राऊतसह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!