बीड(रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यासह राज्यातील काही भागामध्ये कालपासून कोठे ना कोठे गारासह अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा रब्बी पिकासह फळपिकांना तडाका बसू लागला. रात्री बीड तालुक्यात चांगलाच पाऊस झाला. या पावसामुळे काही ठिकाणी ज्वारीचे पिक भुई सपाट झाले. तर वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत. हरभरा सारख्या पिकाला पावसामुळे दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसाने शेतकर्यांचं बहुतांश ठिकाणी नुकसान झालं आहे.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह इतर काही राज्यात पाऊस पडू लागला. काल काही ठिकाणी गारपीटीसह पाऊस झाला. रात्री बीड तालुक्यासह इतर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यंदा पाऊस कमीच पडला त्यामुळे दुष्काळी परिस्थिती परिस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी रब्बी पिक चांगली आलेली आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना तडाका बसला. वाढलेली ज्वारी भुईसपाट झाली. कापूस वेचणीला आलेला असून कापसाच्या देखील वाती झाल्या आहेत. ऊसासारख्या पिकाला मात्र या पावसाचा फायदा झाला. हरभर्यासाठीही पाऊस पोषक मानला जात आहे. आणखी दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. नगर, नाशिक सारख्या शहरात गारपिटीसह पाऊस झाल्याने द्राक्ष बागाचे नुकसान झाले आहे.