
मध्यरात्री तुम्ही आम्ही जेव्हा शांत झोपेत होतो. तेव्हा भारतीय सैनिकांनी पाकिस्तानची झोप उडवून टाकली होती. सिमारेषेच्या किमान 35 किमी अंतरावर असलेल्या एका नव्हे दोन नव्हे तर तब्बल 9 दहशतवाद्यांच्या ठिकाणावर भारताने हवाई हल्ले केले. एका पाठोपाठ एक हल्ला करत अवघ्या 23 मिनिटात दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांचा खुर्दा केला. गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून भारतीयांच्या मनामनामध्ये जी खदखद होती. खून का बदला खून, ती खदखद भारताने एकदाची काढून टाकली अन् नापाक पाकला भारताची ताकद दाखवून दिली. या हल्ल्यात शंभरपेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले. त्यापेक्षा अधिक महत्वाचे म्हणजेच जे पाच चर्चेतले दहशवाद्यांचे कमांडर होते. भारताने त्या पाचही कमांडरचे मुडदे पाडले. भारताने केलेल्या या कारवाईचे देशवासियांतून जेवढे स्वागत होत आहे तेवढेच जगभरातले अनेक देश भारताच्या या कारवाईचे छाती ठोकपणे समर्थन करत आहे. ते केवळ आणि केवळ जगाच्या पाठीवर आता
दहशतवादाला थारा नाही
गेली पाच दशके भारत दहशतवाद सहन करत आहे. गेल्या तीन दशकात काश्मिर खोर्या बरोबर देशातल्या अनेक ठिकाणी जे बॉम्ब स्फोट झाले जे दहशतवादी हल्ले झाले त्यात शेकडो नव्हे हजारो भारतीय महिला विधवा झाल्या. त्यांचे कुंकू पुसले गेले. त्याचाच हा भारताने घेततलेला बदला म्हणावा लागेल. आता निषेध, काळ्या फिती, कॅडल मार्च काढणार नाहीत तर जशास तसे उत्तर दिले जाईल हेच दहशवाद्यांना भारताने आजच्या हल्ल्यातून सांगितले. मुंबईवर हल्ला झाला, भारताच्या संसदेवर हल्ला करण्यात आला. नव्हे नव्हे तर काश्मिर खोर्यात सातत्याने दहशतवाद्यांकडून कतले आम करण्यात आली. रक्ताचे पाट येथे वाहिले गेले. आता तेच रक्ताचे पाट दहशवाद्यांच्या गल्ली बोळात वाहणार. हेच आजच्या हल्ल्यातून स्पष्ट झाले. आज भारताने जी धडाकेबाज कारवाई केली त्या कारवाईत पाकिस्तानच्या एकही सर्व सामान्य व्यक्तीला अथवा मिलिट्रीला दगा फटका होणार नाही याची काळजी घेत केवळ आपल्या अधिकारातून भारताने अतिरेकी चुन चुन के नव्हे तर धुंड धुंड के…. मारे… कारण ज्या पध्दतीने पहलगाम मध्ये अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांना मारले. तो संताप अजुन संपलेला नाही. ज्या 25 पर्यटकांची निरापराध हत्या करण्यात आली. त्या पर्यटकांचा परिवार म्हणजे अखंड भारत आहे आणि त्याच अखंड भारताची भारतीय सेना आहे.
पहलगामचा हल्ला

ज्या पद्धतीने आणि ज्या नियोजनाने करण्यात आला तो अत्यंत व्यूहरचनेतला होता. अतिरेक्यांनी त्यात अनेक मनसुबे आखले होते. प्रामुख्याने काश्मिरमधील अर्थव्यवस्था आता सुधारत होती, गेल्या वर्षी मिलेनियममध्ये पर्यटकांनी काश्मिरमध्ये सुट्टी घालवली होती. त्यामुळे तिथले उद्योग व्यवसाय वाढले होते, तिथे विकासाची कामे सुरू झाली होती आणि हेच पोटसूळ अतिरेक्यांना होते. दुसरे असे हल्ला करताना अतिरेक्यांनी ज्या पद्धतीने धर्म विचारला आणि धर्म विचारून पर्यटकांची हत्या केली त्यातून त्यांना हिंदू-मुस्लिमात दंगली घडवायच्या होत्या. मात्र 25 जणांची शहादत झाल्यानंतरही अखंड देश भारत म्हणून उभा राहिला. देशभरात जातीयतेला थारा दिला नाही. हिंदू-मुस्लिमांनी नापाक पाकिस्तानचे इरादे नेस्तनाबूत केले. हिंदूंनी जेवढी चिड पहलगाम हल्ल्यावर व्यक्त केचली त्यापेक्षा अधिक चीड काश्मिर खोर्यातील मुस्लिमांनी व्यक्त केली. अखंड हिंदुस्तानच्या मुस्लिमांनी पाकिस्तानला घरात घुसून माराची संतप्त प्रतिक्रिया दिली अन् तिथेच पाकिस्तान व अतिरेक्यांचे मनसुबे उधळून गेले. भारताचा तिथेच पहिला विजय झाला आणि आज भारतीय सैनिकांनी
‘ऑपरेशन सिंदूर’

यशस्वी केले. जय जवान जय किसान आणि जय विज्ञानचा नारा देणार्या प्रत्येक भारतीयांचे रक्त तेव्हा उसळले होते जेव्हा निष्पाप भारतीयांची पहलगामध्ये निष्ठूरपणे हत्या केली होती. त्या हत्येचा बदला अवघ्या 23 मिनिटांत भारतीय सैनिकांनी घेतला. या तेवीस मिनिटांच्या हवाई हल्ल्याची क्षणा क्षणाची माहिती कर्नल सोफियान कुरेशी यांनी जेव्हा माध्यमांना दिली तेव्हा अंगावर शहारे येत होते. गेली पंधरा दिवस तना-ममनामध्ये जो राग प्रत्येक भारतीयांनी पाळला होता तो या हवाई हल्ल्यामुळे काहीसा शांत झाला. मात्र जेव्हा मसुद अझहरचा ठावठिकाणा आणि त्याचे निवासस्थान उद्ध्वस्त झाल्याची माहिती आली, जेव्हा अझहरचे पूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडले, जेव्हा अझहर मसुद ढसाढसा रडला आणि काश मै भी मारा जाता, असं जेव्हा म्हणला तेव्हा मसुदच्या हल्ल्यातून ज्या ज्या भारतीयांचे रक्त वाहिले त्या त्या कुटुंबांना थोडेसे तरी हायसे वाटले असेल. मसुद अझहर याच्या पाठोपाठ आणखी शंभरपेक्षा अधिक दहशतवादी आणि त्यांचे परिवार असेच अश्रू ढाळतात तेव्हा उभं जग त्यांना त्या निष्पाप लोकांच्या परिवाराचे आज दाखले देतात. होय, आता
जशास तसे उत्तर
भारत आता थोडेही सहन करणार नाही. दहशतवाद्यांनी नुसती वाकडी नजरही टाकली तर त्या दहशतवाद्यांचे डोळे काढल्याशिवाय भारत शांत राहणार नाही. होय, या हल्ल्यानंतर पाकिस्तान नक्कीच घाबरून गेलाय. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री यांनी आज दुपारी बारा वाजता प्रेसमध्ये जाहीर सांगितले. भारताने हल्ले थांबले तर आम्ही हल्ला करणार नाही. अरे सोड, तू हल्लाही करू शकत नाही आणि तुझ्यात हल्ला करण्याची क्षमताही नाही. भुखे कंगाल असलेल्या पाकिस्तानने आणि तेथील दहशतवाद्यांनी आता भारतावर वाकडी नजर टाकण्याचे धाडस करू नये. कारण आता जशास तसे उत्तर दिले जाईल, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मध्यरात्री अखंड हिंदुस्तानने दिलेलं उत्तर उभ्या जगाने पाहिलं. तेवीस मिनिटांमध्ये नऊ तळ धूंड धूंड के उद्ध्वस्त करू शकतो, तोच भारत पुढच्या पाच मिनिटात काय करू शकतो हे भारतीय सैनिकांनी दाखवून दिले.





