पंकज कुमावत,महसूलची संयुक्त कारवाई
नेकनूर (रिपोर्टर) नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून त्याचा साठा करत पून्हा तो ट्रॅक्टरमध्ये भरून विक्री होत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना मिळाल्यावरून त्यांनी आपले पथक पाठवून महसूलचे अधिकारी कर्मचार्यांना सोबत घेवून नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चांदणी गावात छापा मारला. यावेळी त्यांना दोन ट्रॅक्टर आणि वाळूचा वीस ब्रास साठा मिळून आला. पोलिसांनी ट्रॅक्टरसह वाळूसाठा जप्त करून पुढील कारवाईसाठी नेकनूर पोलिसांच्या ताब्यात दिला.
नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चांदणी गावात अवैध साठा केल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी आपले पथक चांदणी गावात पाठवले. सोबत मंडळाधिकारी जायभाये आणि तलाठी चव्हाण यांनाही बोलावण्यात आले. महसूलच्या अधिकार्यांनी पंचनामा करून तेथील वीस ब्रास वाळूचा साठा आणि दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. याप्रकरणी नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.