बीड (रिपोर्टर) मिल्लिया प्रायमरी गर्ल्सच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती इशरत बाजी यांचे आज सकाळी उपचारा दरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 64 वर्षे होते. त्या जमात-ए-इस्लामीचे शफीक हाशमी यांच्या पत्नी होत्या तर सय्यद अब्दुल हादी कादरी, अब्दुल बारी कादरी यांच्या बहीण होत्या. त्यांचा दफनविधी आज चार वाजता तकिया मस्जिद कब्रस्तान या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.