Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडबचत गटाचे कर्ज माफ करा; मनसेचा कलेक्टर कचेरीवर दंडुका मोर्चा

बचत गटाचे कर्ज माफ करा; मनसेचा कलेक्टर कचेरीवर दंडुका मोर्चा


बीड (रिपोर्टर)- बचत गटाचे कर्ज माफ करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आज मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये तालुकाभरातील शेकडो महिलांची उपस्थिती होती.

हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलापासून निघाला होता.
महाराष्ट्रामध्ये बचत गटाची चळवळ निर्माण झाली होती. बचत गटांना राष्ट्रीय बँकांमार्फत कर्ज वाटप करण्यात आलेले होते. मात्र कोरोनाचा संकट पाहता बचत गटांची कर्ज परतफेड करण्याची सक्षमता राहिली नसल्याने त्यांचे कर्ज माफ करावे, यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये तालुकाभरातील शेकडो महिलांची उपस्थिती होती. या आंदोलनकर्त्या महिलांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांंच्याकडे सादर केले.

Most Popular

error: Content is protected !!