मुंडे भाऊ-बहिणींनी घेतं वैद्यनाथाचं दर्शन; नाथर्यात केलं मतदान
बजरंग सोनवणेंनी सारणीत बजावला मताचा हक्क
जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्तात दुपारपर्यंत 34 टक्के मतदान
बीड/परळी/केज (रिपोर्टर): राज्याचे लक्ष लागून असलेल्या बीड लोकसभेसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून जिल्हाभरातल्य 2 हजार 355 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली असून कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान होत आहे. काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. मतदान अत्यंत शांततेत होत आहे. कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर मतदारांनी गर्दी केली होती. दुपारी एक वाजेपर्यंत बीड जिल्ह्यात 34 टक्के मतदान झाले आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्वप्रथम प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर नाथरा या गावी आपल्य मताचा अधिकार बजावला तर महाआघाडीचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे यांनी आपल्या सारणी गावी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदारसंघात तब्बल 41 उमेदवार निवडणूक रिंगणात असून या सर्वांचे भवितव्य सायंकाळी सहा वाजता मतपेटीत बंद होणार आहे. खरी लढत ही मुंडे विरुद्ध सोनवणे यांच्यात होताना दिसून येत आहे. मतदारांमध्ये उत्साह असल्याचे पहावयास मिळत आहे.
महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात अटीतटीची लढत पहावयास मिळत असून 35 -40 दिवसांच्या प्रचारानंतर आज प्रत्यक्षात जिल्ह्यातल्या 2 हजार 355 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी सर्वप्रथम प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीही प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन आपल्या नाथरा गावी मतदानाचा हक्क बजावला.
इकडे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आपल्या सारणी या गावी जावून मतदानाचा हक्क बजावला.
वंचीतचे अशोक हिंगेंसह अन्य चाळीस उमेदवारांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. बीड जिल्ह्यातल्या आष्टी, गेवराई, माजलगाव, बीड, केज, परळी या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत सुरू आहे. उन्हाची तीव्रता वाढणार असल्याने सकाळीच मतदान केंद्रावर लांबलचक रांगा पहायला मिळत होत्या. काही ठिकाणी कार्यकर्त्यात शाब्दीक चकमक वगळता कुठेही अनुचीत प्रकार अथवा अनुचीत घटना घडल्याचे दुपारपर्यंत दिसून आले नाही. बीड जिल्ह्यातला मतदार साक्षर आणि सुज्ञ असल्याने मताचा टक्काही वाढण्याची शक्यता आहे. बीडमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत 34 टक्के मतदान. मतदान झाले होते. महायुतीच्या पंकजा मुंडे, महाविकास आघाडक्षचे बजरंग सोनवणे, वंचीतचे अशोक हिंगे यांच्यासह 41 उमेदवारांचे भवितव्य आज सायंकाळी सहा वाजता मतदान यंत्रणेत बंद होणार आहे.
अनेक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सुविधा चोख
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी बीड जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केल्याचे दिसून येते. मतदाांच्या सुविधेसाठी विविध उपाययोजना आखल्याचेही पहायला मिळाले. काही ठिकाणी पाळणाघर दिसून आले तर अंबाजोगाईच्या मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंटही पहावयास मिळाले.
जिल्हाधिकारी, एसपींनी बजावला मतदानाचा हक्क
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आज सकाळीच आपल्या मताचा हक्क बजावला. दुसरीकडे जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनीही मतदान केले. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे आणि मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, एसपी या दोन्ही वरिष्ठ अधिकार्यांनी केले.