बीड(रिपोर्टर): कन्फर्मेशन लेटर बनावट तयार करून ते खरे भासवत परिवहन कार्यालयात जावून त्या लेटरच्या आधारे वाहनावरील कर्जाचा बोजा उतरवून घेत स्वत:चा आर्थिक फायदा करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी बीड शहरातील गांधीनगर भागात राहणारा तौफिक खाजा बागवान याच्याविरोधात बीड ग्रामीण पोलीसात कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची तक्रार ही बँकेचे वरिष्ठ लिपीक यांनी दिली आहे.
याबाबत अधिक असे की, बीड शहरातील गांधीनगर भागात राहणारा तौफिक खाजा बागवान याने संभाजीनगर येथील इक्वीटीअस स्मॉल फायनान्स बँक एलटीडी कडून काही कर्ज घेतले होते. ते कर्ज वाहनावर घेण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी बँकेचा फॉम नं. 35 व कन्फर्मेशन लेटर बनावट तयार केले व ते सत्य असल्याचे भासवून त्या आधारे बीड आरटीओ कार्यालयामार्फत वाहनावरून इक्वीटीअस स्मॉल फायनान्स बँक एलटीडीचे कर्ज उतरवून घेवून स्वत:चा आर्थिक लाभ करत शासनाच्या फसवणूक केली. या प्रकरणी संभाजीनगर येथील विक्रमसिंग हरिशचंद्र राजपूत (वय 40 वर्ष) धंदा नोकरी वरिष्ठ लिपीक यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीसांनी बागवान याच्या विरोधात गुन्हा रजि.नं. 169/2024, कलम 420, 467, 468, 471 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.