• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home कटाक्ष

कटाक्ष – वेश्यालयातल्या दारातले हास्य

by गणेश सावंत
May 16, 2024
Reading Time: 1 min read
0
कटाक्ष – वेश्यालयातल्या दारातले हास्य
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गणेश सावंत
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेला बीड जिल्हा तसा मागास. परंतु राज्याच्या कानाकोपर्‍यात राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतीक, अथवा अन्य कुठल्याही क्षेत्रातील घटना घडली, की त्याचा थेट संबंध बीडशी येतो. अशा वेळी खलनिग्रणाय-सद्रक्षणायचे ब्रीद घेऊन सर्वसामान्य जनतेच्या आणि सामाजिक एकोप्याचे कवच असलेल्या पोलिसांकडे मोठी जबाबदारी येते. मात्र गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात बीड जिल्ह्यात पोलीस आहे की नाही ? बरं पोलीस आहे तर ती नेमकी काय करते? पोलीस कशासाठी असते? हे जे प्रश्‍न जनतेला पडले होते त्याचे उत्तर काल मिळाले. गुन्हे आर्थिक शाखेच्या पोलीस निरीक्षकाने थोडी थिडकी नव्हे तब्बल 1 कोटीची लाच मागितली अन् इथच बीडची पोलीस वेश्यालयाच्या दारात उभा ठाकल्याचे दिसून आले. ती बिचारी वेश्या पोटाची खळगी भरण्यासाठी देहविक्री करते, ती इमानदारीने. इथे मात्र इमानदारीलाच नागवं होऊन सेजेवर निजावं लागतं. तेव्हा अशा लाचखोर पोलीस यंत्रणेबाबत गुंड, मवाली, माफिया, दबून राहतील? पोलिसांचा आदर करतील, याचं आत्मपरिक्षण आता बीड पोलिसांनी करायलाच हवे. म्हणूनच आज दोन वर्षांच्या कालखंडातली बीड पोलिसांची कामगिरी आणि त्यांच्या लाचखोरीवर हा आमचा कटाक्ष….


राज्यात जे होत नाही ते बीडमध्ये होते, राज्यात जे मिळत नाही ते बीडमध्ये मिळते. बीड एक भयान वास्तव असे अधिकारीही लिहतात. अधिकार्‍यांमध्ये बीड हे चांगले नाही, असेही बोलले जाते. इथे अधिकारी, कर्मचारी नोकरी करण्यासाठी धजत नाहीत, भीतात. अशी जिल्ह्याची बदनामी केली जाते मात्र बीडमध्ये आलेला अधिकारी पुन्हा बीडमधून जाण्याचे नाव घेत नाही. अशा वेळी बीड चांगले की वाईट? हा प्रश्‍न आम्ही जाणीवपुर्वक बीडला नाव ठेवत बीडमध्ये लाचखोरी करणार्‍या अधिकार्‍यांना विचारू. गेल्या दीड-दोन वर्षापूर्वी बीड जिल्ह्यात नंदकुमार ठाकूर यांची वर्दी झाली. त्यांनी जिल्ह्याचे सुत्र हाती घेतले. तेव्हा या अधिकार्‍याच्या कार्यकाळात गुंड माफिया, अवैध धंदेवाल्यांची दुकाने बंद होतील, बीडचे नंदनवन होईल, असे वाटले होते. मात्र दुर्दैव नंदकुमार ठाकुरांच्या कार्यकाळातच बीड जिल्ह्यात अवैध धंदे फोपावले. वेगवेगळ्या क्षेत्रातले माफिये एकप्रकारे डॉन होऊ पाहू लागले. मग वाळू माफिया असोत, गुटखा माफिया असोत, चंदन तस्कर असोत अथवा मटका आणि क्लब असो. हे सर्व धंदे बिनबोभाट चालू राहिले. कुठे व्हाईट कॉलरवाले धंद्यात मिसळले, तर कुठे पोलीस वाल्यांनीच वाळुचे हायवे खरेदी केले. जेव्हा अवैध धंदे तेजीत येतात, गली का गुंडा जेव्हा माफिया होतो तेव्हा भविष्यातील


सामाजिक एकोप्याला तडा
जाण्याची दाट शक्यता असते. हप्तेखोरीने लालचलेल्या वर्दीच्या मनगटात ते बळच राहत नाही. जिथे अन्याय होत असेल, जिथे अत्याचार होत असेल तिते काठी उगारायला आणि तेच झाले. पोलिसांचा वचक संपला, तो हप्तेखोरी आणि लाचखोरीमुळे. मग काय, अवैध धंदेवाल्यांसाठी, माफिया, तस्करांसाठी जिल्ह्याच्या सीमा खुल्या झाल्या, तिथे अवैध धंद्यातून माफिये सामाजिक तेढात उतरले. सामाजिक तेढातले माफिये मग ते सत्ताकारणातले असतील, राजकारणातले असतील अथवा समाजकारणातून राजकारण, सत्ताकारणात जाऊ पाहणारे इच्छावर्धकही असतील. बीड अस्थिर होत राहिले, एका आंदोलनाला हिंसक वळण लागले, आमदार, खासदरांचे घरं जाळले, पोलीस हात बांधून नुसते बघत राहिले, तेव्हापासूनच बीड पोलिसांवरचा आणि जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुरांवरचा विश्‍वास जिल्हावासियांचा उडाला. चुक करणारे ‘देर आये दुरुस्त आये’ पद्धतीने काम करतील. पुन्हा एकदा जिल्ह्यावर खाकीचा वचक निर्माण करतील, असे वाटत असतान निवडणुका आल्या आणि निवडणुकांमध्येही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. यातून बीड पोलीस केवळ लाचखोरीसाठी आणि हप्तेखोरीसाठीच आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया बीड जिल्ह्यातील जनता देऊ लागली. दुर्दैव याचं वाटतं, बीड जिल्ह्यात


लाखो कुटुंबियांना बँकांनी उद्ध्वस्त केलं
गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात एक नव्हे दोन नव्हे, पाच-पाच-सात-सात मल्टिस्टेट, बँका अक्षरश: हजारो कोटी रुपये घेऊन पळून गेल्या. जिल्हाभरातला लाखाच्या वर असलेला ठेवीदार आर्थिकदृष्ट्या या लोकांनी नागवा केला. अनेक मल्टिस्टेट आणि त्यांच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र बीड पोलीस अथवा ज्या अधिकार्‍यांकडे याचा तपास देण्यात आला, तो तपास घटनेतल्या गांभीर्यातून जेवढ्या जलदगतीने व्हायला हवा तेवढ्या जलदगतीने झालाच नाही. फरारी आरोपींना अद्यापही पोलिसांना अटक करता आलीच नाही. हमाम मे सब नंगे असल्यागत पोलीस यंत्रणेसह जिल्हा प्रशासन हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराकडे गपगुमान बघत राहिले. परंतु पोलिसांकडून तपास का होत नाही याचे उत्तर काल मिळाले. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरीभाऊ खाडे यांनी एका मल्टिस्टेट प्रकरणातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी हजार-पाचशेची नव्हे एक कोटीची लाच मागितली. तिथे तडजोड झाली आणि 30 लाखांच्या तडजोडीत पाच लाखाची रक्कम हरिदास खाडेंच्या नावे एका व्यापार्‍याकडे जमा झाली. लाचलूचपत प्रॠतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी ती रक्कम रंगेहात पकडून खाडेंसह अन्य एकावर गुन्हा दाखल केला. यातून हे स्पष्ट झाले, मल्टिस्टेट मधल्या हजारो कोटी रुपयांचे प्रकरण बीड पोलिसांनी गंभीर घेतले नाही. ते गंभीर घेतले ते केवळ स्वत:च्या हप्तेखोरी आणि लाचखोरीसाठीच. पोलिसांचे हे वर्तन एखाद्या वेश्यालयातल्या बाजारात स्मित हास्य करत लुभावणारं अशी जळजळीत प्रतिक्रिया जेव्हा लोकांतून येते तेव्हा खाकी खरच डागाळते ओ.

Previous Post

मराठवाड्यात फक्त होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचीच गॅरेंटी; गेल्या चार महिन्यात 267 जणांनी घेतला गळफास

Next Post

बोगस कन्फर्मेशन लेटरच्या आधारे वाहनावरचा बोजा उतरविला एकावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
बीड बसस्थानकात चोरट्यांचं बस्तान ,शिक्षकाचं पाकिट मारलं, 84 हजार रुपयांचा ऐवज लंपास

बोगस कन्फर्मेशन लेटरच्या आधारे वाहनावरचा बोजा उतरविला एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?