किल्ले धारूर (रिपोर्टर): आज सकाळी दहा वाजता धारूर येथील घाटामध्ये खत घेऊन जाणारा पलटी झाला आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर दुसर्या व्यक्तीचे पाय व हात फॅक्चर झाले आहेत.
आज सकाळी धाराशिव येथून माजलगावकडे खत घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक एम एच 25 यु ओ 251) अवघड वळणावर ब्रेक निकामी झाल्याने पलटी झाला आहे. यात या ट्रकचा चालक राहुल चंदनशिवे (36 वर्ष) हा तरुण गंभीर झाला होता. त्यास उपचारार्थ अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला तर विष्णू सुरवसे (वय 25 वर्ष) हा जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
धारूर घाट हा मृत्यूचा सापळा बंद आहे दररोज अपघाताच्या घटना घडत असल्याने प्रवासी तसेच चालक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. अवघड असे वळण, अरुंद रस्ता यामुळे धारूर घाटामध्ये दररोज अपघाताची मालिका सुरूच आहे यामध्ये जीवितहानी वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. या धारूर घाटाचे रुंदीकरण करून होणारे अपघात टाळावे अशी मागणी प्रवासी तसेच धारूर येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर करत आहेत परंतु या महत्त्वाच्या बाबीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे कायम दुर्लक्ष होत आहे यामुळेच अनेक अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत.