नवी दिल्ली: नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यासाठीची तयारी दिल्लीत सुरु आहे. राजधानीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानं, पक्षाच्या ६३ जागा घटल्यानं भाजपचं सरकार मित्रपक्षांच्या मदतीवर उभं राहतंय. त्यामुळे एनडीएतील घटकपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. संभाव्य मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन गेले आहेत. नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह, जीतन राम मांझी, एच. डी. कुमारस्वामी, चिराग पासवान, जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल यांना पंतप्रधान कार्यालयाकडून फोन गेलेले आहेत. राज्यातील सहा खासदारांना मंत्रिपद मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. यामध्ये पियूष गोयल, नितीन गडकरी, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांच्यासह शिंदेसेनेच्या प्रतापराज जाधव आणि आरपीआयच्या रामदास आठवलेंचा समावेश आहे. या सहा खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून फोन गेले आहेत.
महायुतीत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळण्याची शक्यता अतिशय धूसर आहे. राष्ट्रवादीकडून राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांचं नाव चर्चेत होतं. पण त्यांना पीएमओकडून फोन आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या ४ जागा लढवल्या. पैकी एक जागाच त्यांना जिंकता आली. अजित पवारांना त्यांच्या बारामतीमध्ये स्वत:च्या पत्नीलादेखील निवडून आणता आलेलं नाही. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाचा महायुतीला नेमका काय उपयोग असा सवाल भाजपचे पदाधिकारी खासगीत विचारत आहेत. आठवलेंना मंत्रिपदासाठी फोन गेलेला आहे. पण राष्ट्रवादीच्या कोणालाही फोन गेलेला नाही. यातून भाजप नेतृत्त्वानं अजित पवारांना योग्य तो संदेश दिल्याचं बोललं जात आहे.
आतापर्यंत कोण कोणत्या खासदारांना फोन?
अमित शहा- भाजप
राजनाथ सिंह- भाजप
नितीन गडकरी- भाजप
ज्योतिरादित्य सिंधिया- भाजप
शिवराज सिंह चौहान- भाजप
पियूष गोयल- भाजप
रक्षा खडसे- भाजप
जितेंद्र सिंह- भाजप
राव इंद्रजीत सिंह- भाजप
मनोहर लाल खट्टर- भाजप
मनसुख मंडाविया- भाजप
अश्विनी वैष्णव- भाजप
शंतनु ठाकूर- भाजप
जी. किशन रेड्डी- भाजप
हरदीप सिंग पुरी- भाजप
बंडी संजय- भाजप
बी. एल. वर्मा- भाजप
किरेन रिजिजू- भाजप
अर्जुन राम मेघवाल- भाजप
रवनीत सिंह बिट्टू- भाजप
सर्वानंद सोनोवाल- भाजप
शोभा करंदलाजे- भाजप
श्रीपाद नाईक- भाजप
प्रल्हाद जोशी- भाजप
निर्मला सीतारमण- भाजप
नित्यानंद राय- भाजप
कृष्णपाल गुर्जर- भाजप
सी आर पाटील- भाजप
पंकज चौधरी- भाजप
सुरेश गोपी- भाजप
सावित्री ठाकूर- भाजप
गिरीराज सिंह- भाजप
गजेंद्र सिंह शेखावत- भाजप
मुरलीधर मोहोळ- भाजप
अजय टमटा- भाजप
धर्मेंद्र प्रधान- भाजप
हर्ष मल्होत्रा- भाजप
प्रतापराव जाधव- शिंदेसेना
रामनाथ ठाकूर- जेडीयू
ललन सिंह- जेडीयू
मोहन नायडू- टिडीपी
पी. चंद्रशेखर पेम्मासानी- टिडीपी
चिराग पासवान- एलजेपी
जीतनराम मांझी- हाम
जयंत चौधरी- आरएलडी
अनुप्रिया पटेल- अपना दल (एस)
चंद प्रकाश- आजसू
एच. डी. कुमारस्वामी- जेडीएस
रामदास आठवले- आरपीआय