हप्तेखोर चकलांबा पोलिसांना माहिती
देऊनही कुणीच फिरकले नाही
गेवराई (रिपोर्टर) जून महिना सुरू होताच गोदाकाठचा शेतकरी शेती मशागतीला लागला असतांना गावात जाण्याचा रस्ता अरूंद आहे त्यातच वाळू वाहतूक करणार्या गाड्या अडचण निर्माण करत असल्याने रात्री राक्षसभूवन परिसरात या वाळूच्या गाड्या अडवून धरत चकलांबा पोलिसांना माहिती दिली मात्र वाळू माफियांचे हप्ते गोळा करून स्वतःच्या तुंबड्या भरणार्या पोलिसांना संबधित गाड्यावर कारवाई कशी करावी म्हणून चकलांबा पोलीस ठाण्याचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी या ठिकाणी फिरकले नाहीत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,गेल्या काही महिण्यापासून चकलांबा ठाणे अंतर्गत येनाऱ्या राक्षसभुवन परिसर वाळू माफियांनी लुटून खाल्ला असतानां आता जुन महिण्याची सुरूवात होताच जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकरी शेती मशागतीसाठी लगबग करत आहेत. परंतु याठिकणचा रस्ता अरुंद आहे वाळूच्या गाड्याचा नाहक त्रास गावकरी यांना नाहक सहन करावा लागत असल्या कारणामुळे रात्री मोठ्या प्रमाणावर वाळूच्या हायवाच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान गावातील माजी सरपंच संभाजी नाटकर यांनी या वाळूच्या गाड्या रोखल्या व गावात जाऊ दिल्या नाही काही काळ याठिकाणी वाळू माफिया आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी त्यांनी महसूल व पोलिस यांनाही याबाबद माहिती दिली परंतू या वाळू माफियांकडून लाखो रुपयांचे हप्ते वसुली करून मिंदे असलेले चकलांबा पोलीस व महसूल अधिकारी याठिकाणी फिरकले नाही. आता यापुढे जर गावात वाळूची गाडी घूसली तर प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा यावेळी माजी सरपंच संभाजी नाटकर यांनी दिला आहे.