बीड, (रिपोर्टर)ः- दोन दिवसापुर्वी बीड तालुक्यातील पाली येथील जि.प. शाळेत मुख्याध्यापक यांनी शिपायाला काम सांगितल्याच्या कारणावरून शिपायाने मुख्याध्यापकाला मारहाण केली होती. त्याची तात्काळ दखल घेत शिपाई विजय गायकवाड याला मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी तात्काळ निलंबीत केले आहे.
पाली येथील जिल्हा परिषद शाळेवर विजय गायकवाड हे शिपाई म्हणुन कार्यरत आहेत. मुख्याध्यापक आणि त्यांच्यात काही कारणावरून वाद विवाद होते. त्यातच दोन दिवसापुर्वी मुख्याध्यापक आणि विजय गायकवाड या शिपायाला शाळेतील काम सांगितले. याचा राग अनावर होवून विजय गायकवाड यांनी मुख्याध्यापकाला शाळेतच मारहाण केली. याची तक्रार मुख्याध्यापकानी मुख्य कार्यकारी अधिकारी पाठक यांच्याकडे लेखी केली होती. मुख्याध्यापकाची तक्रार खरी आहे का खोटी आहे याची खातरजमा करून घडलेला प्रकार खरा आहे हे सिध्द झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी शिपाई विजय भगवान गायकवाड यांना तडाफडकी निलंबीत केलेले आहे.