शाळेवर फक्त दोनच शिक्षक
नेकनूर (रिपोर्टर): नेकनूर जिल्हा परिषद आणि उर्दू शाळेमध्ये आज फक्त दोन शिक्षक उपस्थित दिसून आले. इतर शिक्षक विविध काणावरून गैरहजर असल्याचे दिसून आल्याने पालकात संताप व्यक्त करण्यात येत होता. ग्रा.पं. सदस्य आणि काही प्रतिष्ठीत नागरिकांनी शाळेची पाहणी केल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसून आला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या शाळेकडे लक्ष देऊन शाळेवर न येणार्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
नेकनूर जि.प. शाळेमध्ये शिक्षकांची संख्या आधीच कमी असताना आहे ते शिक्षक दांड्या मारत असल्याचे दिसून आले. मुलांची संख्या जास्त आहे मात्र मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने मुलांचे शैक्षणीक नुकसान होऊ लागले. याठिकाणी मराठी आणि उर्दू अशा दोन्ही शाळा आहेत. या शाळेवर आज फक्त दोन शिक्षक हजर असल्याचे दिसून आले. गावचे सरपंच लांडगे, ग्रा.पं.सदस्य सय्यद साजेद अली, नदीम मंडोला, सय्यद रिजवान यांनी शाळेची पाहणी केल्यानंतर त्यांना शाळेवर शिक्षक नसल्याचे दिसून आले. याबाबत शिक्षण विभागाने लक्ष घालून दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.