बीड (रिपोर्टर): तीन चार दिवसांपासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात सततधार सुरू आहे. या पावसाने पुर्णत: जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, परळी या तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. आतापर्यंत 33.05 एमएम पावसाची नोंद करण्यात आली. होळ, बनसारोळा आणि बर्दापूर या तीन मंडलात अतिवृष्टी झाली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये तीन चार दिवसांपासून पाऊस सक्रीय झाला. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली नसल्याने सततधार सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन विष्कळीत झाले. सर्वत्र पाणीच पाणी दिसून येवू लागले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 33.05 एमएम इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अंबाजोगाई, केज, परळी या तीन तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. बनसारोळा होळ आणि बर्दापूर या तीन मंडलामध्ये जास्त पाऊस पडला असल्याची नोंद करण्यात आली आहे. आजही सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली.
तालुका निहाय
काल पडलेला पाऊस
बीड-30.07, पाटोदा-24.0, आष्टी 7.6, गेवराई 29.03, माजलगाव 27.03, अंबाजोगाई 57.01, केज 61, परळी 48.07, धारूर 35, वडवणी 32.06, शिरूर 33.03
बीड तालुक्यातील मंडलनिहाय पाऊस
बीड-31, पाली 30.03, म्हाळसजवळा 31.05, नाळवंडी 43, राजुरी 21, पिंपळनेर 43.05, पेंडगाव 38, मांजरसुंबा 22.05, चौसाळा 32.03, नेकनूर 22.05, लिंबागणेश 22.05.
टिप / बातमीत वापरलेला फोटो प्रतिकात्मक आहे