Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडमंत्री मशनरीचे मालक दिलीप मंत्री यांचे निधन सायंकाळी 5 वा. अन्त्यविधी

मंत्री मशनरीचे मालक दिलीप मंत्री यांचे निधन सायंकाळी 5 वा. अन्त्यविधी


बीड (रिपोर्टर):
पिंपळनेरचे भुमिपूत्र तथा मंत्री मशनरीचे मालक दिलीप प्रेमसुख मंत्री यांचे आज सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 53 वर्षे होते. परवा त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराच्या तिव्र झटक्यामुळे त्यांचे उपचारादरम्यान औरंगाबादेत निधन झाले. आज सायंकाळी 5 वा. मोंढा भागातील मुक्तीधाममध्ये त्यांच्या पार्थिवदेहावर अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


दिलीप प्रेमसुख मंत्री हे व्यक्तीमत्त्व आजादशत्रू होतं. सर्वांशी मनमोकळेपणाने वागणं, बोलणं, अडल्यानडलेल्यांच्या कामी येणं, आपल्या व्यवसायातून शेतकर्‍यांना मदत करणं अशी त्यांची ओळख होती. ते माहेश्‍वरी प्रगती मंडळाचे बीडचे माजी अध्यक्ष होते. तर ते सध्या माहेश्‍वरी महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य म्हणून काम पाहत होते. जालना रोडवरील व्यापारी संघटनेचे माजी सचिव राहिलेले दिलीप मंत्री आपल्या व्यवसायामध्ये नाव कमावून होते. प्रतिष्ठित व्यापारी म्हणून त्यांच्याकडे पाहितलं जात होतं. परवा दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना तात्काळ औरंगाबाद येथे हलवण्यात आले. हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार होते. मात्र दुर्दैवाने आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

सायंकाळी 5 वा. त्यांच्या पार्थिवदेहावर मोंढा रोड भागातील मुक्तीधाममध्ये अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांची अन्त्ययात्रा सारडा रेसीडन्सी येथून निघणार आहे. ते प्रमोद मंत्री यांचे ज्येष्ठ बंधू होते. त्यांच्या पश्‍चात आई, भाऊ, बहीण, पत्नी, मुले असा परिवार आहे. मंत्री परिवाराच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!