लुटारू कर्मचार्यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही?
महाई सेवा केंद्राकडून कर्मचारी घेतात आगावू पैसे
बीड, (रिपोर्टर)ः-उत्पन्न, डोमासाईल, रहिवाशी प्रमाणपत्र महाई सेवा केंद्र मार्फत काढले जातात. नियमानुसार हे प्रमाणपत्र काढण्यासाठी काही ठरावीक रक्कम आकारण्यात आली. मात्र यापेक्षा अव्वाचे सव्वा पैसे घेवून हे प्रमाणपत्र दिले जाते. विशेष करून बीड तहसिलमधील कर्मचारी महाई सेवा केंद्राकडून जास्तीचे पैसे घेत आहेत. त्यामुळे महाई सेवा केंद्रावाले संबंधित लोकांकडून एका प्रमाणपत्रासाठी 100 ते 150 रूपये घेवून लुट करत आहेत. सध्या लाडकी बहिण आणि शालीय महाविद्यालयीन कामकाजांसाठी विविध कागदपत्रांची गरज असल्याने कागदपत्र काढण्यासाठी महाई सेवा केंद्रात तोंबा गर्दी उसळलेली आहे. याचाच गैरफायदा सध्या कर्मचारी उचलू लागले. सर्व सामान्यांची लुट करणार्या तहसिल मधील कर्मचार्यावर कोणाचे नियंत्रणआहे की नाही असा प्रश्न उपस्थित होवू लागला.
नियमित लागणारे कागदपत्र लवकर मिळावे यासाठी शासनाने जागो जागी महाई सेवा केंद्र सुरू केले. या केंद्र मार्फत संबंधित नागरीकांना कागदपत्र मिळतात. महाई सेवा केंद्रावाले ऑनलाईन तहसिलच्या माध्यमातून ही कागदपत्रे मंजुर करून घेत असतात. गेल्या चार दिवसापुर्वी शासनाने लाडकी बहिण योजना सुरू केली यासाठी विविध कागदपत्राची गरज आहे हे कागदपत्रे काढण्यासाठी प्रत्येक महाई सेवा केंद्रात महिलांची मोठी गर्दी होवू लागली. याचाच गैरफायदा तहसिल मधील कर्मचारी उचलू लागले. कागदपत्र काढण्यासाठी नियमानुसार ठरावीक रक्कम आकारण्यात आली असली तरी महाई सेवा केंद्र चालकांना तहसिलमधील चार टेबल सांभाळणार्या कर्मचार्यांना पैसे द्यावे लागतात. एक्या प्रमाणपत्र 100 ते 150 रूपये घेतले जात आहेत. एवढी मोठी लुट तहसिलमधील कर्मचार्यांकडून होत असतांनाही याकडे वरिष्ठ अधिकारी साफ दुर्लक्ष करत
असल्याचे दिसुन येत आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी फक्त या कागदपत्राची आवश्यकता
लाडकी बहिण योजना शासनाने सुरू केल्यानंतर पुर्वी उत्पन्न, डोमासाईल, रहिवाशी प्रमाणपत्राची गरज हेाती. मात्र शासनाने यामध्ये बदल केले. आता फक्त पुरावा म्हणुन टि.सी, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड याकागदपत्राची गरज आहे. जेणेकरून दोन दिवसापुर्वी अनेक महिलांनी उत्पन्न,डोमासाईल, रहिवाशी प्रमाणपत्र काढण्यासाठी संबंधितांना पैसे सुध्दा दिले आहेत. मात्र या कागदपत्राची आता गरज लागणार नाही.
तहसिल मधील ते डेबल मिळवण्यासाठी कर्मचार्यांची धडपड
बीड तहसिल कार्यालयामध्ये उत्पन्न, डोमासाईल, रहिवाशी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र सह इतर प्रमाणपत्र मंजुर केले जातात. यासाठी ठरावीक टेबल तयार करण्यात आले आहेत.या टेबलवर काम करणार्या कर्मचार्यांची बारा महिने चांदी असते, लठ्ठ पगार असतांनाही कर्मचारी प्रत्येक एका प्रमाणपत्रासाठी 100 ते 150 रूपये घेवून सर्व सामान्यांची लुट करतात. हे टेबल आपल्याला मिळावे यासाठी अनेक कर्मचार्यांनी मर-मर असते. अगदी वरिष्ठांपासुन ते राजकीय पुढार्यांपर्यंत टेबल मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. यात मोठी तडजोड सुध्दा होत असते.