केज (रिपोर्टर) साळेगाव जवळ एका बोलेरो जीप आणि ऊस बगॅस वाहतूक करणार्या ट्रकने जोराची धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात जीपच्या चालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
खामगाव सांगोला महामार्ग क्र. 548-सी या महामार्गावर केज ते साळेगाव दरम्यान साळेगाव येथील शंकर विद्यालया जवळ दि. 13 जुलै बुधवार रोजी पहाटे 4:00 वा. च्या दरम्यान बोलेरो जीप क्र. (एम एच-20/डी जे- 9563) हिला ऊस बगॅसची वाहतूक करणार्या ट्रक क्र. (एम एच-09/सी ए-4590) ने समोरून जोराची धडक दिली. यात बोलेरो जीप ड्रायव्हर सोनू अन्सारी शेख वय (25 वर्ष) आणि मधल्या सीटवर झोपलेले नशीर बशीर शेख वय (36 वर्ष) दोघे रा. थेटेगव्हाण ता. धारूर हे जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालकाने रुग्णवाहिका आणि पोलीसांशी संपर्क साधून जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तिर्थ ग्रामिण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार केले. नंतर नशीर बशीर शेख याला सुट्टी देण्यात आली आहे. तर सोनू अन्सारी शेख याला लातूर येथे हलविले आहे. अपघाताची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजू गुंजाळ हे घटनास्थळी हजर झाले. पोलीस नाईक राजू गुंजाळ यांनी
ट्रक ड्रायव्हर रविंद्र महादेव रुपनर रा. नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूर याच्यासह अपघातातील ट्रक ताब्यात घेतला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.