तो प्राणी बिबट्या असल्याचा शेतकर्यांचा दावा
किल्ले धारूर (रिपोर्टर): तेलगाव येथील भडुळी तांडा परिसरात गुरूवारी रात्री अज्ञात हिंस्र वन्य प्राण्याने शेळ्यांवर हल्ला करत पाच शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली.दरम्यान तो हिंस्र प्राणी बिबट्याच बिबट्यानेच शेळ्या ठार मारल्याचा दावा येथील शेतकरी करत आहेत. वनविभागाने त्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा.अशी मागणी राम लगड, श्रीराम लगड, प्रकाश चव्हाण आदि शेतकर्यांनी केली आहे.या घटनेने परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात शेतकर्यांनी दिलेली माहिती अशी की,तेलगाव ता.धारूर येथील भडुळी तांडा येथील शेतकरी प्रकाश धेना चव्हाण यांनी नित्याप्रमाणे गुरुवारी रात्री आपल्या शेळ्या घरासमोर बांधल्या होत्या.मध्यरात्री अचानक कुत्रे भुंकण्याच्या आवाजाने तांड्यातील नागरिक जागे झाले.चव्हाण यांच्या घरातील लोकांनी घराबाहेर येऊन पाहिले तर तेथे त्यांच्या पाच शेळ्या मृत अवस्थेत दिसुन आल्या.त्यानंतर त्यांनी आरडाओरड करून इतर लोकांना जागे केले.मात्र गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात बिबट्या आल्याची चर्चा असल्याने नागरिक घरापासून दुर जाण्यास भिऊ लागले.त्यानंतर सकाळी या घटनेची माहिती धारूर वनविभागास दिल्याने वनपाल नवनाथ पाईक आपल्या इतर कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी मृत शेळ्यांचा पंचनामा करून, घटना व परिसरात पाहाणी करत नेमका हा हल्ला कोणत्या प्राण्याने केला.याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांच्या हाती ठोस कांही मिळाले नाही.त्यामुळे शेळ्यांच्या मृत्युचे कारण स्पष्ट झाले नाही.यावेळी वनपाल पाईक यांच्या सोबत आलेले पशु वैद्यकीय अधिकारी कंकाळ यांनी मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले.दरम्यान हा हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने याचा उलगडा झाला नाही.त्यातच गेल्या आठ दिवसांपासून याच परिसरात बिबट्या आल्याचे चर्चा असल्याने बिबट्यानेच शेळ्या मारल्या असतील. असा परिसरातील नागरिकांना संशय आहे.त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट
तो अज्ञात वन्य हिंस्र प्राणी ×पाईक
भडुळी तांडा येथील शेळ्यांचा मृत्यु अज्ञात वन्य हिंस्र प्राण्याच्या हल्ल्याने झाला असुन, तो नेमका प्राणी कोणता हे पी एम रिपोर्ट आल्यावरच समजेल. असे वनपाल पाईक यांनी सांगत या परिसरातील शेतकऱी, नागरिकांनी सावधता बळगता दक्ष राहणे गरजेचे असून, नागरिकांनी सर्तकता बाळगावी.असे आवाहन करत या परिसरात बिबट्याला लंपण्यासारखा जागा नसल्याने तो येथे नसेल असेही पाईक यांनी सांगितले.